DCPS योजना लागू असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-२ मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबत. | DCPS Update

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-२ (Tier-II) मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबत.

दिनांक १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंमलात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती दि. 07/07/2007 च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांची दि. १ जानेवारी २००६ ते ३१ मार्च २००९ पर्यंतच्या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन खात्यात स्तर-२ मध्ये जमा करण्याचे निर्देश दि. 29/04/2009 च्या शासन निर्णयातील परि १५.२ अन्वये देण्यात आले होते. थकबाकीची रक्कम स्तर-२ मध्ये जमा करण्याची कार्यपध्दतीदेखील दि. 14/12/2010 अन्वये निश्चित करण्यात आलेली आहे.

NPS वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत | Partial Withdrawal from NPS

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना स्तर- २ मधे जमा असलेल्या रकमेचा परतावा देण्याबाबत दि. 28/07/2017 च्या शासन परिपत्रकान्वये कार्यवाही करण्यात येत आहे. आता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सदर रक्कम व त्यावरील देय व्याज अदा करण्या बाबत शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय

१. शासन निर्णय वित्त विभाग क्र. अंनियो १०१०/प्र.क्र. ६७/सेवा-४, दि. १४/१२/२०१० नुसार ज्या कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत स्तर-२ मध्ये जमा करण्यात आलेली आहे, त्यांना एकूण देय रक्कमेचा परतावा त्यावरील व्याजासह परत करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. याबाबत आहरण व संवितरण अधिकारी यांनी कशाप्रकारे कार्यवाही करावी याबाबत माहीती खालील लिंक वर क्लिक करुन पाहता येईल.

DCPS धारकांची जमा असलेली सहाव्या वेतन आयोग थकबाकीची रक्कम व त्यावरील व्याज कर्मचाऱ्यांना परत करण्यासाठी कार्यपध्दती.

२. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची स्तर-२ मध्ये जमा असलेली रक्कम प्रदान करण्यासाठी ती खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी.

"मागणी क्र. जी - ९९ ८३४२ इतर ठेवी(००) (११७) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (००) (०१) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ८३४२००८८-५० इतर खर्च"

३. सदर रकमांचा परतावा मंजूर करण्याकरीता संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन ज्या कार्यालयातून आहरित होत आहे त्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

४. प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्तर-२ च्या रकमांचा परतावा करण्याकरीता त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास सक्षम असलेल्या कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

५. उपरोक्त लेखाशीर्षाखाली आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद राज्य अभिलेख देखभाल अभिकरण यांनी आवश्यकतेनुसार त्या-त्या आर्थिक वर्षात करावी.

६. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचारी / अधिकारी यांच्या सहाव्या वेतन आयोग थकबाकीची एक किंवा अनेक हप्त्यांची स्तर-२ ची रक्कम चुकीच्या वर्गीकरणामुळे त्यांच्या प्रान (PRAN) खात्यावर स्तर १ मध्ये जमा झाली असल्यास अशा प्रकरणी आहरण व संवितरण अधिकारी यांनी कळविल्यानंतर कोषागार अधिकारी सदर स्तर-२ ची रक्कम अधिक शासन अंशदान त्यावरील व्याजासह ईआरएमव्दारे परत मागविण्याची कार्यवाही शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक: अंनियो २०१७/प्र.क्र.२८/ सेवा ४ दि.२८/०७/२०१७ मधील परिच्छेद ३ व ४ नुसार करतील.

७. वरील कार्यपध्दती जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफरांसह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र शासन निर्णय स्वतंत्र लेखाशिर्षासह संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरून करावी.

( शासननिर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा. )

Post a Comment

0 Comments