Good News | NPS वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत | Partial Withdrawal from NPS | NPS Update

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या वर्गणीमधुन अंशत: रक्कम आहरित करणेबाबत सूचना (Partial Withdrawal)

शासन परिपत्रक :

1) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या सभासदांना त्यांच्या सेवा कालावधीत अंशत: रक्कम काढण्याची (Partial Withdrawal) सविस्तर कार्यपध्दती निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी त्यांच्या दि.10/08/2017 च्या अधिनियमानुसार तसेच दि.09/04/2020 च्या परिपत्रकान्वये विहित केलेली आहे. त्यानुसार खालील तरतुदी विभागांच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहेत.

2) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या जमा अंशदानाच्या रकमेपैकी फक्त २५% रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण ( PFRDA ) यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार खालील कारणांकरिता काढता येईल.

क) स्वत:च्या किंवा दत्तक मुलगा / मुलगी यांच्या उच्च शिक्षणाकरिता.

ख) स्वतःच्या किंवा दत्तक मुलगा / मुलगी यांच्या विवाहाकरिता.

ग) कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या नावे घर खरेदीकरिता (तथापि कर्मचाऱ्याच्या स्वत: च्या किंवा वैवाहिक जोडीदाराच्या नावे एखादे घर असेल तर अशा कर्मचाऱ्यास या प्रयोजनासाठी रक्कम काढता येणार नाही.)

घ) निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांची उपरोक्त दिनांक १०/०८/२०१७ ची अधिसूचना व दिनांक ०९/०४/२०२० च्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा सभासद, सभासदाचा कायदेशीर वैवाहिक जोडीदार / मुले/दत्तक मुले/अवलंबून असलेले आई वडील यांच्या खालील गंभीर आजारासाठी (वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे) अशंत: रकमेचे आहरण अनुज्ञेय आहे.

१) कर्करोग (Cancer)

२) मूत्रपिंड निकामी होणे (Kidney Failure End Stage Renal Failure)

३) प्राथमिक पलमनरी धमनी उच्च रक्तदाब (Primary Pulmonary Arterial Hypertension)

४) एकाधीक स्क्लेरोसिस (Multiple Sclerosis)

५) प्रमुख अवयव प्रत्यारोपण (Major Organ Transplant)

६) कोरोनरी आर्टरी बायपास कलम (Coronary Artery Bypass Graft)

७) महाधमनी कलम बायपास शस्त्रक्रिया (Aorta Graft Surgery)

८) हृदय झडप शस्त्रक्रिया (Heart Valve Surgery)

९) स्ट्रोक (Stroke)

१०) हृदय स्नायुमध्ये रक्ताची गुठळी होणे (Myocardial Infarction)

११) कोमा (Coma)

१२) संपूर्ण अंधत्व (Total Blindness)

१३) कोविड- १९ (Covid-१९)

१४) अर्धांगवायू (Paralysis)

१५) गंभीर जीवघेणी दुर्घटना (Accident of Serious / life threatening nature)

१६) या व्यतिरिक्त PFRDA यांच्याकडून यापुढे निर्गमित होणाऱ्या परिपत्रकानुसार अन्य गंभीर आजारासाठी (Any other Critical illness of life threatening nature as stipulated in the circulars, guidelines or notifications issued by the PFRDA from time to time)

3) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांस त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर केवळ कर्मचाऱ्यांच्या जमा अंशदानाच्या संचित राशीतून रक्कम आहरण करता येईल.

DCPS योजना लागू असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-२ मध्ये जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबत.

4) कर्मचाऱ्यास त्यांच्या संपूर्ण सेवेच्या कालावधीत जास्तीत जास्त ३ वेळा अंशत: रक्कम आहरण करता येईल.

5) शासकीय कर्मचाऱ्यांनी अंशत: रक्कम काढण्यासाठी लेखी अथवा ऑनलाइन अर्ज त्यांच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून जोडावी.

6) आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशंत: रक्कम काढण्याचा कर्मचाऱ्याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ दिवसात त्याची छाननी करावी. मागणी नियमानुसार असल्यास असा अर्ज आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालय यांचेकडे सादर करावा.

7) अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालय यांनी सदर अर्जाची ३ दिवसात छाननी पूर्ण करावी व मागणी अर्ज नियमानुसार असल्यास निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (NSDL) यांना ऑनलाईन सादर करावा. अन्यथा प्रकरण आक्षेपित करून परत करावे.

अ) प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांसाठी :

प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांनी त्यांचा अर्ज सेवा संवर्ग नियंत्रित करणाऱ्या विभाग प्रमुखांस / त्यांचे सेवा पुस्तक ज्या कार्यालय प्रमुखाच्या कक्षेत असते त्या कार्यालयास सादर करावा. सदर कार्यालय प्रमुखांनी उपरोक्त नमुद कार्यपध्दतीप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

( शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. )


Post a Comment

0 Comments