मातृतिर्थ बुलडाणा जिल्हा व परीसरातील पर्यटन व प्रेक्षणीय स्थळांची माहीती | Tourist Places In Buldana District | Buldana Tourism

जागतिक पर्यटन दिनाच्या निमीत्ताने दिपाली सुसर यांनी मातृतिर्थ बुलडाणा जिल्हा व परीसरातील पर्यटन व प्रेक्षणीय स्थळांची माहीती त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे. त्यांच्या पुर्वपरवानगीने सदर माहीती वाचकांसाठी उपलब्ध करुन देत आहोत. दिपाली ताईंचे मनपुर्वक धन्यवाद....


आज जागतिक पर्यटन दिन. जाणून घेऊया आपल्या बुलडाण्यातल्या खास पर्यटन स्थळांबद्दल...

1. लोणार सरोवर - कमळजा देवीचे मंदिर, बारव चा सुरेख दगडीकामात कोरलेला संपूर्ण परिसर

2. सिंदखेडराजा - मातृतीर्थ जिजाऊंचे जन्म ठिकाण म्हणजेच माहेर घर, प्राचीन वाडा, प्राचीन शिल्प, प्राचीन काळातील दैनंदिन वापरतील वस्तू इथे पाहायला मिळतात. मोती तलाव, लखुजीराजे जाधव यांची समाधी व काही प्राचीन मंदिरे.

3. हिवरा आश्रम - येथील स्वामी विवेकानंद आश्रम मनाला शांती देणारं सुरेख ठिकाण. तिथूनच जवळ ओलांडेश्वर ठिकाण - इथं नदीपात्रातील अप्रतिम असं महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल.

4. मेहकर - प्रसिद्ध असं बालाजी मंदिर,  नरसिंह मंदिर, कंजनी महल, दुर्ग बोरी, सप्त ऋषीचं ठिकाण.

5.देऊळगावराजा - खडकपुर्णा धरण, तेथूनच जवळ देऊळगावराजाला सुप्रसिध्द बालाजी मंदिर, जुनी प्राचीन बारव आणि इथंच आता नवे झालेले विविध बियाण्यांचे हब तुम्ही पाहु शकता, गिरोली रोडवर पिंपळणेर येथे मारुतीचे मंदीर असुन जवळच गुगळादेवीचे मंदीर आहे. पिंप्री आंधळे या गावात जोगेश्वरी महादेव मंदिर आहे.

6. चिखली – प्रसिध्द रेणुका देवीचे मंदीर, साकीगाव, सातगाव-भुसारी येथील डोळयांची पारणं फेडणारी हेमाडपंथी प्राचीन मंदिरे

7. शेंदुर्जन -  चक्रधर स्वामींचा मठ आहे. पुढे गेलात की एक मोठी गढी, प्राचीन राममंदिर आहे

8. अमडापूर - प्रसिद्ध असं बल्लाळ देवीचं मंदिर आहे. नवरात्रीत तुम्ही जाऊ शकता. अनेक प्राचीन खुणा तिथे आजही आहे. सोबतच तेथे प्राचीन असा हजरत मुसावली बाबाचा दर्गासुध्दा आहे.

9. डोंगरशेेवली - इथं शिवमंदिर आहे अगदी प्राचीन. इथून येताना बुलढाणा जिल्ह्यातील आनंदवन म्हणुन ओळखलं जाणारं सेवा संकल्पप्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता. येतांना भादोल्यातील काही मंदिर देखील पाहू शकता.

10. बोथा - घाटात तुम्ही जंगल सफारीला जाऊ शकता. या जगंलात एकच नदी तुम्हाला सात ठिकणी भेटते. जैविक संपत्तीने समृध्द असा बोथा घाट आहे.

11. शेगाव - गजानन महाराज संस्थानला तुम्ही भेट देऊ शकता. गेल्यानंतर फक्त आमच्या शेगावच्या संस्थानच्या आत मधील स्वच्छता आणि शिस्त यांचा मेळ नक्की बघाल आणि येतांना आठवणीने शेगाव कचोरी खायला विसरु नका. अजून एक आता तर आनंद सागर बघण्याचा स्टे पण उठवला आहे, तुम्ही तिथे देखील जाऊ शकता. तिथून पुढे नागझरीला देखील जाऊ शकता. येतांना औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या खामगावला देखील भेट द्या. तिथली खादी आणि चांदी एकेकाळी जगप्रसिद्ध होती.

12. नांदुरा – 105 फुट उंच असलेली भव्य-दिव्य हनुमानाची मुर्ती तुम्हाला पाहायला भेटेल.

13. सलाईबन - सातपुडा पर्वत रांगाची पर्वणी आम्हाला लाभलेली आहे. त्यात सलाईबन नावाचं एक सुरेख, अद्भुत गाव मंजितसिंग सरांनी उभं केलय, तिथं नक्की भेट दया. सलाईबनला तुम्हाला आदिवासी लोकांची संस्कृती जवळून पाहायला मिळेल.

14. बुलडाणा - बुलडाण्यावरुन हाकेच्या अंतरावर जर जायचं असेल तर हिवाळ्यात पावसाळ्यात राजुर घाट विविधतेने नटलेला असतो. तेथे आता तयार झालेलं बालाजी मंदिर आहे. घाट ओलांडून पुढे गेला की, थोडं आत एक शिवमंदिर आहे. तिथून छान झुळझुळ एक छोटी नदी वाहते. जुनी मोठमोठी वडांची झाड आहेत. परत येतांना मोठं असं धम्मगिरी लागतं. तिथली तेजदार बुद्धाची मुर्ती पाहून मनाला समाधान मिळतं.

15. गिरडा - बुलडाण्यापासून जवळच गिरडा नावाचं गाव आहे. तेथे तुम्ही जाऊ शकता. स्वयंप्रकाश बाबांच्या समाधीस्थळाजवळ भव्यदिव्य बांधकाम चालू आहे. चहुबाजूने निसर्ग नटलेला असतो, शांत अशी जागा आहे.

16. बुलडाण्यातून तुम्ही अजिंठ्याच्या लेणी पाहायलासुध्दा जाऊ शकता. त्याचं वर्णन तर शब्दात करणं अशक्य आहे.

17. जाळीचा देव - जिथं मराठीचा पहिला आदय ग्रंथ लिहला गेला. चक्रधरांनी काही काळ मुक्काम केला असं ते ठिकाण. तिथून पुढे गेलात कि एक कालिंका देवीचं डोंगराच्या आत कोरलेल मंदिर आहे. पाण्यासाठी प्राचीन काळात दगडात तयार केलेले 52 कुंड आहे. निसर्गाचा हा अविष्कार अनुभवायला तुम्ही नक्की जा.

18. मढ- गिरडयापासून जवळच असलेल्या बुधनेश्वरला देखील तुम्ही जाऊ शकता. नदीचा उगमस्थान तिथे आहे. अन प्राचीन शिवमंदिर व तोंड फुटलेला मोठा नंदी आहे.

19. शिवना गावाचा किल्ला पाहून तुम्ही पुढे आमसरीला जाऊ शकता. भारी ठिकाण आहे. छान धबधबा पडतो डोंगरावरुन. समोर संपूर्ण डोंगररांग. त्यात वसलेले छोटे छोटे गाव. मस्त नजराना असतो हिवाळ्यात.

20. देऊळघाट - प्राचीन किल्ला आहे. पण अगदी बोटावर मोजण्याइतके अवशेष तिथं शिल्लक आहेत. त्या किल्ल्याबाबत असं सांगतात की, घाटाखालच्या रोहिणखेडला देखील असाच एक किल्ला आहे. पुर्वीच्या काळी काही संदेश दयायचे असले तर देऊळघाटच्या किल्ल्यावर ठराविक प्रकारचे गवत जाळले जात. तर त्याचा धुर रोहिणखेडच्या किल्ल्यावर दिसायचा. धुराच्या रंगावरुन संदेश नेमका सुखाचा आहे की दु:खाचा आहे हे कळायचे.

21. मोताळा - येथून जवळच जयपुर गाव आहे. तेथे आजही मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री आणि पायविहीर आहे.

22. खामगाव - मधील लासुरा खुर्द, खामगाव गोंधणपूरचा किल्ला, बाळापुरचा किल्ला, गढयांचं गाव म्हणून ओळख असलेलं चिंचपूरही तुम्ही पाहायलाच हवं.

23. चांडोळ - मंदिरांचं गाव म्हणून चांडोळची एके काळी ओळख होती. चांडोळ गावात अनेक प्राचीन शैलीत बांधलेले दगडी मंदिरं आहे.

24. संग्रामपूर - जटाशंकर नावाचा धबधबा आहे. पावसाळ्यात तुम्ही तिथे जाऊ शकता.

25. तपोवण - चिखलीजवळच तपोवण इथं देवीचं मंदिर आहे. रेखीव अशी आखणी करुन हे बांधकाम केले आहे.

26. सैलानी बाबा दर्गा चिखलीजवळील हे ठिकाण हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे.

27. अंबाबरवा - संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा अभयारण्य. सातपुड्याच्या कुशीत मस्त लपून बसलेले हे अभयारण्य आहे.

28. मेहुणा राजा - संत चोखामेळा यांचे जन्मस्थान.

29. रोहिनखेड - येथील प्राचीन मशिद

30. दुधा - मर्दडी मातेचे मंदिर.

31. पातुर्डा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. ऐतिहासिक घटना

धावडा या गावाजवळील वडाळी येथील सीडी घाट

कालिंका माता मंदिरावर जाताना वाढोणा येथील टेबल टॉप वरून सावळतबारा

अशी असंख्य लहान-मोठी ठिकाणे बुलडाणा जिल्ह्यात आहेत. तुम्ही ती नक्की पाहायला हवी.

Buldana Katta

लेखन - दिपाली सुसर

Post a Comment

2 Comments

Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.