(वित्त विभाग शासन निर्णय क्र. अनियो २०१८/प्र.क्र.२८८/सेवा-४, दिनांक ०८/१०/२०२१ च्या परिच्छेद १ मध्ये निर्दिष्ट केलेले)
जोडपत्र १
शासन निर्णय वित्त विभाग क्र. वेपुर
१२०९/प्र.क्र. ६९/ सेवा-९, दि. २९/०४/२००९ नुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर-२
मध्ये जमा असलेली सहाव्या वेतन आयोग थकबाकीची रक्कम व त्यावरील व्याज कर्मचाऱ्यांना
परत करण्यासाठी कार्यपध्दती.
अ) आहरण व संवितरण अधिकारी यांनी
करावयाची कार्यवाही:
१. आहरण व संवितरण अधिकार्यांना
सेवार्थ प्रणालीतील त्यांच्या लॉगीनमध्ये खाली नमूद टॅबमध्ये सहाव्या वेतन आयोगाचे
पाचही हप्ते परिपूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी दिसेल. सदर यादीत कर्मचार्यांची
पाचही हप्त्याची रक्कम व त्यावर देय असलेल्या व्याजासहित एकूण देय रक्कम
दर्शविण्यात आली आहे. Worklist>DCPS > Arrears>6th Pay
Commission Arrears Deposition to DCPS> Tier-II Inst Approve
२. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी
सेवार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांच्या नावा समोर असलेल्या चौकटीत "टिक" करून
परतावा प्रकरणी मंजुरी पूर्व तपासणीसाठी अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी
यांच्याकडे ऑनलाईन पध्दतीने "नमुना एक" मध्ये सादर करावी.
३. सेवार्थ प्रणालीत तयार होणाऱ्या
"नमुना एक", "नमुना दोन" व "नमुना तीन"
साक्षांकित छायाप्रती सहाव्या वेतन आयोग थकबाकीच्या रकमा स्तर 2 मध्ये जमा केलेले
देयकांचे प्रमाणक क्रमांक व दिनांक नमुद करून अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार
अधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावेत.
४. अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार
अधिकारी यांनी उपरोक्त परिच्छेद अ (३) नुसार प्राप्त प्रस्ताव एक अथवा अनेक
कर्मचाऱ्यांच्या त्रुटीमुळे नाकारल्यास सदर एक अथवा अनेक कर्मचाऱ्यांची माहिती
आहरण व संवितरण अधिकारी यांचे सेवार्थ प्रणाली लॉगीनमध्ये त्रुटीपूर्ततेसाठी
पुन्हा उपलब्ध होईल. त्यातील त्रुटींचे निराकरण करून आहरण व संवितरण अधिकारी यांनी
दुरुस्त केलेला प्रस्ताव उपरोक्त अ (१) व अ
(२) नुसार अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार अधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी फेरसादर
करावा.
५. अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार
अधिकारी यांनी मंजूर केलेली प्रकरणे एक किंवा अनेक कर्मचाऱ्यांच्या नावासमोर
"टिक" करुन आहरण व संवितरण अधिकारी यांनी खाली नमूद टॅबमध्ये Generate
Order या पर्यायातून
"नमुना सहा" मध्ये मंजूर आदेश तयार करावा. कार्यालय प्रमुखांनी असे आदेश
स्वाक्षरी करून अधिदान व लेखा अधिकारी / कोषागार अधिकारी ( लेखापरिक्षा शाखा, डीसीपीएस/ एनपीएस शाखा यांना प्रत्येकी
प्रत) तसेच संबंधित कर्मचारी यांना उपलब्ध करून द्यावी. मंजूरी आदेशाची एक प्रत
देयकासोबत जोडावी व एक प्रत कार्यालयीन नस्ती अभिलेख्यात जतन करावी.
Worklist>
DCPS> Arrears > 6th Pay Commission Arrears Deposition to DCPS> Tier-II
Order Generation
६. सेवार्थ प्रणालीत तयार झालेल्या
मंजूरी आदेशानुसार सेवार्थ प्रणालीतील Generate Bill या पर्यायाखाली देयक तयार होईल.
Worklist>
DCPS> Arrears>6th Pay Commission Arreurs Deposition to DCPS> Tier-II
View Bill
७. सेवार्थ प्रणालीत देयक तयार
केल्यानंतर आहरण संवितरण अधिकारी यांनी राज्य अभिलेख देखभाल अभिकरण कार्यालयाकडे
अनुदानाची मागणी नोंदविण्यासाठी Forward to SRKA for Grant या पर्याया द्वारे ऑनलाइन मागणी सादर
करावी. राज्य अभिलेख देखभाल अभिकरण कार्यालयाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर Forward
to BEAMS या
पर्यायाचा वापर करून अर्थसंकल्पीय प्राधिकारपत्र तयार करावे.
Worklist>
DCPS> Arrears 6th Pay Commission Arrears Deposition to DCPS > Tier-II
View Bill
८. अर्थसंकल्प प्राधिकारपत्र तसेच
"नमुना-सहा" (स्तर २ परतावा आदेश), "नमुना सात" व "नमुना
आठ" इत्यादीसह प्रचलित कार्यपध्दतीनुसार देयक मंजुरीसाठी कोषागारात सादर
करावे.
Worklist>
DCPS> Arrears 6th Pay Commission Arrears Deposition to DCPS > Tier-II
View Bill
९. मजूरी आदेशात काही त्रुटी राहिल्यास
आहरण व संवितरण अधिकारी त्याच्या स्तरावर देयक रद्द करतील व नव्याने मंजूरी आदेश
तयार करून पुन्हा देयक संस्करीत करतील.
१०. ज्या कर्मचाऱ्यांचे सहाव्या वेतन
आयोग फरकाचे एक अथवा अनेक हप्ते गहाळ झाले आहेत अशा कर्मचा-यांची यादी उपरोक्त
परिच्छेद अ (३) मध्ये नमूद टॅबमध्ये Pending Report या link वर स्वतंत्रपणे दर्शविण्यात येईल. आहरण
व संवितरण अधिकारी यांनी याबाबत गहाळ रक्कमाबाबत (Missing Credit) राज्य अभिलेख देखभाल अभिकरण
कार्यालयाचे पत्र क्र. रामदेअ / २०२१/Missing Credit / ९८ दि. १०/०२/२०२१ मधील सूचनांनुसार
कार्यवाही करावी. सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अशा कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन
आयोगाच्या थकबाकीच्या पाचही हप्त्यांची नोंद प्रणालीमध्ये परिपूर्ण अद्यावत झाल्यानंतरच
प्रदानासाठी आहरण व संवितरण अधिकार्यांच्या लॉगीनला उपलब्ध होतील, अ (१) अ (२) व अ (३) मध्ये नमुद
केल्यानुसार पुढील कार्यवाही करावी.
११. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन
योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा यापूर्वीच मृत्यू/राजीनामा/सेवामुक्त/बडतर्फ/नियत
वयोमान सेवानिवृत्त इ. कारणांमुळे समाप्त झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांना
त्यांच्या डीसीपीएस खात्यातील शिल्लक रक्कम स्तर-२ च्या रकमेचा अंतिम परतावा यापूर्वीच
करण्यात आला आहे. तसेच भविष्य निर्वाह निधी योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना
देखील स्तर-२ मध्ये जमा असलेल्या रकमा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी
खात्यावर वर्ग करण्यात आल्या आहेत. अशा प्रकरणी दुबार प्रदान होणार नाही याची
दक्षता आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी.
१२. प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांच्या
बाबतीत मुळ संवर्गाच्या विभागप्रमुखानी प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांच्या स्तर २
मध्ये जमा झालेल्या रकमांच्या चलनांची पडताळणी कोषागार कार्यालयाकडून करावी आणि
"नमुना एक", "नमुना दोन" व "नमुना तीन" मध्ये
उचित प्रस्ताव कोषागार कार्यालयास सादर करावा.
१३. आहरण संवितरण अधिकाऱ्याने उपरोक्त
प्रमाणे कार्यवाही करून स्तर-२ मधील रक्कमा व्याजासह परत करण्याची कार्यवाही पूर्ण
केल्यानंतरच स्तर-२ मध्ये जमा असलेले पाच हफ्ते व त्यावरील देय व्याज याची एकूण
रकम संबंधीत कर्मचाऱ्यांना प्रदान केल्यानंतर वेळोवेळी लेखाशिर्ष ८३४२ चा ताळमेळ
घ्यावा.
ब) अधिदान व लेखा अधिकारी/कोषागार
अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही:
१. आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून
"नमुना एक", "नमुना दोन" व "नमुना तीन" याची
त्या सोबत प्राप्त कागदपत्रांसह तपासणी करावी. नमुना चार" व " नमुना
पाच" ला सेवार्थ प्रणालीवर खालील टॅबचा वापर करून मंजूरी द्यावी. दुबार
प्रदान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
Worklist>DCPS>
Arrears 6th Pay Commission Arrears Deposition to DCPS> Tier- II Inst Approve
२. प्रणालीमार्फत प्राप्त झालेल्या
प्रस्तावातील एखाद्या कर्मचार्यांच्या प्रकरणी काही त्रुटी आढळल्यास केवळ संबंधित कर्मचाऱ्याचे प्रकरण सकारण अमान्य करावे. असे नाकारलेले
प्रकरण संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांना प्रणालीवर पुनः प्राप्त होईल.
3. आहरण व संवितरण अधिकारी यांनी
त्रुटींची पूर्तता करून सेवार्थ प्रणालीत ऑनलाईन पुन्हा सादर केलेल्या प्रस्तावावर
अधिदान व लेखा कार्यालय/कोषागार कार्यालय यांनी उपरोक्त १ प्रमाणे कार्यवाही
करावी.
क) राज्य अभिलेख देखभाल अभिकरण
कार्यालयाने करावयाची कार्यवाही:
राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई यांचेकडून आहरण व संवितरण
अधिकारी यांना देयकानुसार अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर अनुदान वितरण केले जाईल.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.