RTE ADMISSION 2024-25 ऑनलाईन अर्ज भरण्याची सर्वात सोपी पद्धत आणि संपूर्ण माहिती.

आर.टी.ई. 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे.

टीप:- खालील कागदपत्रे अर्ज भरतांना पोर्टलवर अपलोड करण्याची आवश्यकता नसते. मात्र कागदपत्रावरील माहीतीची व कागदपत्रांची सत्यता पडताळणी समीतीमार्फत करण्यात येते. आर.टी.ई. 25 % ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतचीच असावीत. त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत याची नोंद घ्यावी.

1) रहिवासाचा / वास्तव्याचा पुरावा ( सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता)

रेशनिंग कार्डड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना.)वीज/ टेलिफोन बिल देयकपाणी पट्टीप्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टीगॅस कार्डबँक पासबुकआधार कार्ड, मतदान ओळखपत्रपासपोर्ट या पैकी कोणतेही एक ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरारनामा हा निवासी पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येईल.

2सामाजिक वंचित जात संवर्गातील असल्यास प्रमाणपत्र (वडिलांचे / बालकाचे )

या गटात अर्ज भरणार्‍या बालकांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसीलदार/ उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा (वडिलांचा / बालकाचा) जातीचा दाखला आवश्यक आहे. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येत नाही.

3दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे

जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षकअधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.

4HIV बाधित / प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे

जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधीक्षकअधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र

5आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला

तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्रसॅलरी स्लीपकंपनीचा किंवा Employer चा दाखला (मागील आर्थिक वर्षाचे परंतु एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले) उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही.

6जन्माचा दाखला ( सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता)

ग्रामपंचायत /न.पा./ म.न.पा. यांचा दाखला / रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला / आंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला / आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन.

7) घटस्फोटित महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) न्यायालयाचा निर्णय.

2) घटस्फोटित महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा

3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

8न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा.

2) घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.

3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

9विधवा महिला असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) पतीचे मृत्यूपत्र (प्रमाण पत्र)

2) विधवा महिलेचा / बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा.

3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाण पत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला.

10) एकल पालकत्व असल्यास (single parent) आवश्यक कागदपत्रे

आई किंवा वडील या पैकी निवडलेल्या व्यक्तीची कागदपत्रे ग्राह्य

11अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे

1) बालगृह / अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतात.

2) जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

ऑनलाइन अर्ज कसा भरावा? याबाबत मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल वरील व्हिडिओ आपल्या मदतीसाठी खाली दिलेला आहे.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇



Post a Comment

0 Comments