संकलित मूल्यमापन चाचणी १ चे गुण chatbot वर नोंदण्यासाठी सुविधा


महाराष्ट्र राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे आयोजन शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

          विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी -१ (PAT -२) चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

१. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चाटबॉट मार्गदर्शिका लिंक -

https://bit.ly/PATUserManual


तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.

२. संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) गुणांची नोंद करणेसाठी लिंक -

https://bit.ly/PAΤ-ΜΗ


चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी खाली दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा.

https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA

Post a Comment

0 Comments