Special Bal Sangopan Leave | विशेष बाल संगोपन रजा | महाराष्ट्रातील कर्मचारी घेऊ शकतात 730 दिवसांची विशेष बाल संगोपन रजा

सदर रजा मान्यता प्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये यामधील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचारी यांनादेखील लागू आहे.

विकलांग व्यक्तींसाठी (समान संधी, हक्काचे संरक्षण आणि पूर्ण सहभाग ) अधिनियम, १९९५ मधील कलम १३, उपकलम (१) अन्वये स्थापित केलेल्या राज्य समन्वय समितीची शिफारस विचारात घेऊन, पुढे नमुद केल्यानुसार अपत्य असलेल्या शासकीय महिला कर्मचाऱ्यास तसेच पुढे नमुद केल्यानुसार अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास म्हणजेच अशा अपत्याच्या वडीलांनादेखील संपूर्ण सेवेत ७३० दिवसांच्या कमाल मर्यादेत विशेष बाल संगोपन रजा मंजूर करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.

रजेसाठी ग्राह्य धरण्यात येणारी विकलांगता

() विकलांग व्यक्तींसाठी (समानसंधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील कलम २ (झ) नुसार पुढील विकलांगता

(१) अंधत्व (Blindness),

(२) क्षीण दृष्टी (Low vision),

(३) बरा झालेला कुष्ठरोग (Leprosy-cured)

(४)श्रवण शक्तीतील दोष (Hearing impairment)

(५) चलनवलन विषयक विकलांगता (Loco Motor disability)

(६) मतिमंदता ((Mental retardation)

(७) मानसिक आजारपण (Mental illness)

सदर विकलांगता उपरोक्त अधिनियमातील विकलांगतेबाबतच्या व्याख्येप्रमाणे असणे अनिवार्य आहे तसेच सदर विकलांगता किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केलेले पाहिजे.

(आ) दि नॅशनल ट्रस्ट फॉर दि वेलफेअर ऑफ पर्सन्स विथ ऑटीझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन आणि मल्टीपल डिसॅबिलीटी अॅक्ट १९९९ मधील कलम २ (ए), २(सी), २(जी), २(एच) व २(ओ) मध्ये वर्णन केल्यानुसार अनुक्रमे आत्ममग्न(Autism),

सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy)

 मतिमंद(mental retardation),

बहुविकलांग (multiple disabilities)

गंभीर स्वरुपाची विकलांगता ( severe disability) असलेले अपत्य

सदर रजा अनुज्ञेयतेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत

1) उपरोक्त परिच्छेद क्र.१ मधील विकलांगतेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक (Civil Surgeon) अथवा त्यापेक्षा वरिष्ठ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने अथवा शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार निर्गमित केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

2) सदर रजा हक्क म्हणून मागता येत नाही. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व मान्यतेनेच सदर रजा घेता येते.

3) सदर रजा विकलांग अपत्याच्या वयाच्या २२ वर्षापर्यंत घेता येते.

4) सदर रजा पहिल्या २ हयात अपत्याकरीता लागू राहते.

5) विशेष बाल संगोपन रजेच्या कालावधीसाठी रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जेवढे वेतन मिळत असेल तेवढे रजा वेतन देण्यात येते.

6) सदर रजा एकाहून अधिक हप्त्यामध्ये (Spell) तथापि एका आर्थिक वर्षात तीनपेक्षा जास्त नाही अशा मर्यादेत घेता येते.

7) विशेष बालसंगोपन रजेचा हिशोब स्वतंत्र प्रपत्रात नोंदवुन सेवापुस्तकात नोंदविण्यात येतो.

8) परिविक्षाधीन कालावधीत विशेष बाल संगोपन रजा मान्य करता येणार नाही तथापि, कर्मचाऱ्यास विकलांग अपत्याबाबतच्या गंभीर परिस्थितीमुळे रजा घेणे अत्यावश्यक आहे अशी रजा मंजूर करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री झाल्यास, परिविक्षाधीन कालावधीत अपवादात्मक परिस्थितीत कमीत कमी कालावधीची विशेष बालसंगोपन रजा घेता येईल. त्या प्रमाणात संबंधित महिला/पुरुष शासकीय कर्मचाऱ्याचा परिविक्षाधीन कालावधी वाढविला जाईल.

9) विशेष बाल संगोपन रजेस पात्र असणारा महिला/पुरुष शासकीय कर्मचारी एकापेक्षा जास्त वेळा नवीन नियुक्ती स्वीकारत असेल अशा बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणच्या कालावधीची रजा एकत्रित गणली जाऊन, अशा एकूण सेवेच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवस इतकीच रजा अनुज्ञेय होईल.

10) अर्ज केल्यास विशेष बाल संगोपन रजेला जोडून अन्य अनुज्ञेय रजा जोडून घेता येईल मात्र अन्य अनुज्ञेय रजा कालावधी एक वर्षापेक्षा अधिक असणार नाही.

11) विकलांग अपत्य शासकीय कर्मचाऱ्यावर अवलंबून आहे, असे प्रमाणपत्र शासकीय कर्मचाऱ्याने सादर करणे अनिवार्य आहे.

विशेष बालसंगोपन रजा शासननिर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

(विशेष बालसंगोपन रजा शासननिर्णय )

Post a Comment

0 Comments