महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. विधानपरिषदेच्या (vidhanparishad) 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीसाठी तुम्ही जर मतदार असाल तर तुम्ही तुमचे नाव आणि मतदान केंद्र मोबाईलवर शोधू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मतदार यादीतील आपले नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.