संदर्भ - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दिनांक 09/10/2024 रोजीचे पत्र
Blended Courses आपणास DIKSHA APP वर पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्म वर आपली नोंदणी असणे आवश्यक आहे. नोंदणी कशी करावी हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.
शिक्षकांसाठी सूचना :
1. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी सदर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स साठी नोंदणी करावी.
2. सदर कोर्स मराठी माध्यमात उपलब्ध आहेत तथापि इतर माध्यमातील शिक्षक हा कोर्स करण्यास इच्छुक असल्यास सदर कोर्सला नोंदणी करू शकतात व तो पूर्ण करू शकतात.
3. इयत्ता पहिली ते आठवी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी प्राथमिक स्तर कोर्स साठी नोंदणी करावी.
4. इयत्ता नववी व दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक स्तर कोर्ससाठी नोंदणी करावी.
5. सद्यस्थितीत एका शिक्षकाला एका वेळी एकाच कोर्ससाठी नोंदणी करता येईल.
6. सदर कोर्स पूर्ण करताना कोर्समधील सर्व व्हिडीओ पूर्णपणे पाहून विषयाची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. सर्व व्हिडिओ पाहून झाल्यावरच मूल्यमापनासाठी प्रश्न उपलब्ध होतील.
7. सदर ब्लेंडेड कोर्समध्ये पाच तास व्हिडिओ अवलोकन, मूल्यमापन व एक दिवसांची PLC पूर्ण करणे अनिवार्य आहे.
8. NEP २०२० च्या निर्देशानुसार सदरचा एक कोर्स पूर्ण केल्यानंतर एका शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) आवश्यक ५० तासांपैकी १० तास ग्राह्य धरण्यात येतील.
9. PLC सह कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना कोर्स पूर्णत्वाचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळेल व प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येईल.
10. ब्लेंडेड कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर शिक्षक पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येतील.
प्राथमिक शिक्षकांनी खालीलपैकी कोणताही एक कोर्स पूर्ण करावा. सर्व कोर्समध्ये मोड्यूल संख्या चार असून ते पूर्ण करण्यासाठी म्हणजेच व्हिडिओ पाहून प्रश्न सोडवण्यासाठी किमान पाच तासांचा वेळ आवश्यक आहे.कोर्स सुरू करण्यासाठी कोर्सच्या नावावर क्लिक करा.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.