विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३०, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे मार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. तरी शासकीय , स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT महाराष्ट्र) या चैटबॉटवर नोंदवावेत.
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे.
PAT (महाराष्ट्र) चैटबॉट मार्गदर्शिका
या लिंकवर पाहता येईल.
प्रशिक्षण यु ट्यूब लिंक :

0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.