मतदार यादीत आपले नाव ऑनलाईन कसे शोधावे ?
मित्रांनो, कोणतीही निवडणुक म्हटली की, आपणास
मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. आणि नवीन मतदार नोंदणी,
मयत मतदार वगळणी या कारणांमुळे वेळोवेळी मतदार यादीमध्ये बदल होत असतो. त्यामुळे आपला
मतदार यादीतील क्रमांक देखील बदलत असतो. मतदान करण्यासाठी बुथ वर गेल्यानंतर आपणास
आपला मतदार यादीतील क्रमांक सांगावा लागतो. आजच्या लेखात आपण आपले नाव व आपला क्रमांक
ऑनलाईन पध्दतीने कसा शोधायचा या विषयी माहीती पाहणार आहोत.
मतदार यादीत आपले नाव व क्रमांक शोधण्यासाठी
खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम राज्य निवडणुक आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
- आपणास वरच्या पट्टीत Find Name In Voter List असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
- मतदार यादीत नाव व क्रमांक शोधण्यासाठी येथे क्लिक करा.
- त्यानंतर आपणास नवीन वेबसाईटवर नेले जाईल.
- त्याठिकाणी आपणास Search by Details आणि Search by Epic No. असे दोन पर्याय दिसतात.
- आपणास जर आपला मतदार कार्ड क्रमांक माहीती असेल तर आपण Search by Epic No. हा पर्याय वापरुन आपले नाव शोधु शकता.
- अन्यथा आपण Search by Details हा पर्याय वापरावा.
- त्यानंतर आपणास आपले नाव, वडीलांचे नाव, वय किंवा जन्मतारीख, लिंग अशा स्वरुपाची माहीती भरावी.
- त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, विधानसभा क्षेत्र निवडावे व कॅप्चा टाकुन Search बटनवर क्लिक करावे.
- आपणास आपण प्रविष्ट केलेल्या नावाप्रमाणे यादी दिसेल.
- आपल्या नावासमोरील View Details या बटनावर क्लिक केल्यास आपणास आपली संपुर्ण माहीती दिसेल. ज्यामध्ये आपला यादी भाग क्रं. व मतदार यादीतील अनुक्रमांक देखील समाविष्ट आहे.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.