भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा ५ डिसेंबर २०२१ पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३०
नोव्हेंबर २०२१ या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर ५ जानेवारी २०२२ रोजी
विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याच
मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार
आहेत. त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली आहे; परंतु या आगामी निवडणुकांची मोठी
संख्या लक्षात घेवून संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्याची मागणी
राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्फत भारत
निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार या कार्यक्रमास ५ डिसेंबर २०२१ पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास
मुदतवाढ मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने
आता पुन्हा १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र
नागरिकांना ५ डिसेंबर २०२१ पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त
झाली आहे. ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची
पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील
तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. त्यासाठी विधानसभा मतदारसंघांच्या १ नोव्हेंबर
२०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री
करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे, तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी केले आहे.
नाव नोंदवताना वयाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी
कोणताही एक दस्तावेज हवा :
- · जन्म दाखला,
- · शाळा सोडल्याचा दाखला
- · जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी/आठवी/दहावी/बारावी यांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका
- · पॅन कार्ड
- · वाहन चालक परवाना
- · भारतीय पासपोर्ट
- · आधार कार्ड
- नाव नोंदवताना निवासाच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणताही एक दस्तावेज हवा :
- · बँक/किसान/ टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड
- · भारतीय पासपोर्ट
- · वाहन चालक परवाना
- · अलीकडील भाडेकरार
- · पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल (हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती आई/वडील/पती/पत्नी - यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते.)
- · प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
- · भारतीय टपाल विभागाद्वारे तुमच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर तुम्हांला प्राप्त झालेले कोणतेही टपालपत्र
· आपल्याकडे असणार्या मोबाईलवरच Voter Helpline App च्या मदतीने नाव नोंदणी कशा प्रकारे करावी? याबाबत माहीतीसाठी खालील व्हिडीओ पुर्ण पहा.
अधिक माहितीसाठी चॅटबॉट
राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने
मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यांसदर्भातील संपूर्ण माहिती 'महाव्होटर चॅटबॉट' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे
उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी http://bit.ly/mahavoter या दुव्यावर (लिंक) क्लिक करून किंवा 7669300321 या व्हॉट्सॲप क्रमांकावर hi करून
माहिती मिळवू शकतो अथवा https://mahavoter.in
या संकेत स्थळालाही भेट देऊ शकता.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.