महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पगार बिल शालार्थ प्रणाली मार्फत दरमहा बनवण्यात येतात.
याच शालार्थ प्रणालीवरुन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आपले वैयक्तीक पगारपत्रक स्वत: डाऊनलोड करु शकतात. पगारपत्रक /Salary slip डाउनलोड करण्यासाठी आपणास शालार्थ ID. माहिती असणे आवश्यक आहे. (शालार्थ ID म्हणजे पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID होय.)
आपले पगारपत्रक आपण कसे डाऊनलोड करु शकता?
Shalarth site -
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
1) आपले पगारपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. नंतर तुमच्यासमोर
दिसणार्या pop up window मध्ये always allow करा.
2) तुम्ही शालार्थ च्या लॉगीन पेजवर आलेले असाल. लॉग इन पेजवर Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका. आणि पासवर्ड मध्ये तुमचा BYDefault पासवर्ड असलेला ifms123 हा पासवर्ड टाका.
3) तुम्ही लॉगीन झालेले असाल. लॉग इन केल्यानंतर आपणास पासवर्ड बदलने
आवश्यक आहे. त्यासाठीची Window आपल्यासमोर दिसेल. त्यामध्ये Old password ifms123 हा टाका आणि New password आपल्या आवयश्कतेनुसार बनवा. (त्यात Capital letter, Small letter, Character, Digit यांचा समावेश असावा). आणि Change
Password या
बटनावर क्लिक करा.
Employee Login चा पासवर्ड विसरल्यास रिसेट कसा करावा?
4) नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर तिथे worklist नावाचा एकच मेनु दिसेल. त्यामध्ये Employee Corner – Employee Pay slip नावाचा एकच टॅब आहे. त्यावर क्लिक करा.
5) आपणास आपली माहीती दिसेल. त्याखाली आपणास ज्या महीन्याचे
पगारपत्रक काढायचे आहे तो महीना व त्यापुढे वर्ष निवडा. आणि view salary slip या बटनावर क्लिक करा.
6) त्यानंतर आपल्यासमोर
निवडलेल्या महिन्याचे पगारपत्रक दिसेल. ते आपण print अथवा save देखील करु शकता. 2019 नंतरच्या आपणास हव्या त्या महिन्याचे पगारपत्रक आपण डाउनलोड करु
शकता. आणि सदरचे पगारपत्रक हे संगणकीकृत असल्याने त्यावर कोणत्याही अधिकार्याच्या
सहीची आवश्यकता नाही.
अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.