Maharashtra TET 2021 Admit Card | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET 2021) टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र

Maharashtra TET 2021: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET 2021) टीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र आज अधिकृत वेबसाइट वर जारी करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून जारी होणार आहे.

अधिकृत वेबसाइट mahatet.in वर जाऊन हे प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकणार आहात. ही परीक्षा 21/11/2021 रोजी कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित केली आहे. आधी ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र नंतर ती दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. सदर परीक्षा 31 ऑक्टोबर रोजी होणार होती मात्र या दिवशी आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे आता या परीक्षेचा पहिला पेपर 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 ते 1 आणि दुसरा पेपर 2 ते 4:30 या वेळेत होणार आहे.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

शिक्षकांच्या ४० हजार रिक्त पदांसाठी घेतली जाणार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१

परीक्षा 30 तारखेला,  कोरोना नियमांचं करावं लागणार पालन

ही परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षार्थींना प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत घेऊन जायचं आहे. तसंच सर्व कोरोना नियमांचं देखील पालन करावं लागणार आहे. परीक्षेला येताना मास्क, सॅनिटायझर सोबत ठेवावं लागणार आहे. सोबतच परीक्षार्थींमध्ये सामाजिक अंतर देखील ठेवलं जाणार आहे.

दोन वर्षांच्या कालावधीनंतर टीईटीची परीक्षा होत आहे. त्यामुळे 10 लाखांहून अधिक इच्छुकांनी परीक्षेसाठी अर्ज केला असल्याची माहिती आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी इयत्तेसाठीच्या शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये पेपर एक हा पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी आणि पेपर दोन सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असतो. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतात.

आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अपडेटेड माहिती मिळवा. जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

Post a Comment

0 Comments