आता BLO कडे जाण्याची गरज नाही! घरबसल्या मोबाईलवरून शोधा २००२ च्या यादीतील तुमचे नाव

SIR Mapping: सन २००२ च्या मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाईन कसे शोधायचे? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप सोपी प्रोसेस

घरबसल्या मोबाईलवरून शोधा २००२ च्या यादीतील तुमचे नाव

सध्या महाराष्ट्रभर SIR (Special Intensive Revision) म्हणजेच मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. या प्रक्रियेचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपले किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव सन २००२ च्या मतदार यादीत शोधणे. बीएलओ (BLO) कडे किंवा ऑनलाईन एसआयआर मॅपिंग करताना या २००२ च्या यादीतील भाग क्रमांक (Part Number) आणि अनुक्रमांक (Serial Number) आवश्यक पडतो.

तुमचे किंवा तुमच्या पालकांचे नाव २००२ च्या यादीत असेल, तर ते मोबाईलवरून घरबसल्या कसे शोधायचे? याची संपूर्ण डिजिटल पद्धत खालीलप्रमाणे आहे:

🛠️स्टेप १: 'ECI Net' अधिकृत ॲप डाऊनलोड करा

🔸सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Google Play Store ओपन करा.

🔸दिलेल्या सर्च बारमध्ये ECI Net असे टाईप करून सर्च करा.

🔸निवडणूक आयोगाचे (Election Commission) अधिकृत ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ते Open करा.

🔍 स्टेप २: नाव सर्च करण्याचा पर्याय निवडा

🔸ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला होम स्क्रीनवर विविध शासकीय सेवांचे पर्याय दिसतील.

🔸यापैकी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या 'Search your name in last SIR 2026' किंवा 'Search your name in last SIR' या पर्यायावर क्लिक करा.

📝 स्टेप ३: २००२ मधील भौगोलिक माहिती भरा

हा फॉर्म भरताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की, तुम्ही सन २००२ मध्ये ज्या ठिकाणी राहत होता, त्यानुसारच माहिती भरायची आहे:

🔸State: तुमचे राज्य (Maharashtra) निवडा.

🔸District: तुम्ही सन २००२ मध्ये ज्या जिल्ह्यात राहत होता, तोच जिल्हा याठिकाणी निवडा (जर तुम्ही आत्ता जिल्हा बदलला असेल, तरी जुनाच जिल्हा निवडावा).

🔸Assembly: तुमची २००२ मधील विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) निवडा.

🔤 स्टेप ४: मतदाराचे पूर्ण नाव टाका

खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला 'Elector Full Name' चा बॉक्स दिसेल.

याठिकाणी तुमचे स्वतःचे नाव टाका. (मतदार यादीत ज्या पद्धतीने नाव आहे तसेच नाव येथे टाका नाहीतर search result मिळणार नाही.)

नाव टाकून झाल्यानंतर खाली दिलेल्या 'Search' बटनावर क्लिक करा.

मोबाईलवरून ५ मिनिटात भरा SIR फॉर्म. घरबसल्या Enumeration form भरा.

💡 नाव सापडले नाही तर काय करावे? (महत्त्वाची टीप)

जर तुमचे स्वतःचे नाव पूर्ण टाकूनही शोधता येत नसेल, तर काळजी करू नका. सन २००२ मध्ये कदाचित तुमचे वय मतदानाचे नसेल किंवा नाव वेगळ्या पद्धतीने नोंदवले गेले असू शकते. अशा वेळी:

त्या बॉक्समध्ये तुमच्या वडिलांचे किंवा आईचे पूर्ण नाव टाकून सर्च करा.

तुमच्या आजोबांचे किंवा आजीचे नाव टाकूनही तुम्ही शोधू शकता.

सर्च केल्यानंतर त्या नावाशी संबंधित यादी समोर येईल, त्यातून तुमच्या कुटुंबाचे नाव तपासून घ्या.

📸 स्टेप ५: स्क्रीनशॉट (Screenshot) काढून ठेवा

यादीमध्ये तुमचे, वडिलांचे किंवा आईचे नाव योग्य माहितीसह (भाग क्रमांक आणि अनुक्रमांक) दिसू लागताच, त्याचा तातडीने एक स्क्रीनशॉट काढून मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा. जेव्हा तुमचे बीएलओ (BLO) तुमच्या घरी एसआयआर मॅपिंगसाठी येतील किंवा तुम्ही स्वतः ऑनलाईन फॉर्म सबमिट कराल, तेव्हा हा स्क्रीनशॉट पुरावा म्हणून आणि त्यातील यादी क्रमांक अत्यंत उपयोगी पडेल.

आवाहन: 

एसआयआर मॅपिंगची ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे, जेणेकरून तुमचे नाव मतदार यादीत सुरक्षित राहील. ही महत्त्वाची आणि माहितीपूर्ण पोस्ट महाराष्ट्रातील आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा!

Post a Comment

0 Comments