महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
२०२१ (MAHATET-2021) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयावर सोपविलेली असून ही
परीक्षा रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.
इ.१ ली ते ५ व ६ वी ते ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व
माध्यम, अनुदानित/ विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक
पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
या परीक्षेशी संबंधित ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा
शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा आपण पाहणार आहोत तसेच याबाबतचा तपशील
परिषदेच्या वेबसाईट वर देण्यात आला आहे. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची
प्रक्रिया दिनांक ०३/०८/२०११ पासून सुरु होत असून दि.२५/०८/२०२१ अखेरपर्यंत
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील.
MAHA TET 2021 वेळापत्रक
१.ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा
कालावधी – ३ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१
२. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढणे – २५ सप्टेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२१
३.
टीईटी पेपर १ दिनांक व वेळ - १० ऑक्टोबर २०२१ वेळ सकाळी १०.३० ते १.००
४. टीईटी पेपर २ दिनांक व वेळ - १०
ऑक्टोबर २०२१ वेळ दुपारी २.०० ते ४.३०
परीक्षा शुल्क
१. सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा. / भ.ज. -
५०० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ८०० रुपये (दोन्ही पेपर)
२. अनु.जाती, अनु.जमाती व दिव्यांग - २५० रुपये (फक्त पेपर १ / २ ) / ४०० रुपये
(दोन्ही पेपर )
MAHA TET परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका आराखडा, अभ्यासक्रम
(1) TET पेपर 1 अभ्यासक्रम,
तयारीची दिशा
1. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर आधारित 6 ते 11 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न
विचारले जातात. यात अध्ययन,
अध्यापन, विशेष बालकांच्या गरजा, शालेय
आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व
शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
2. मराठी भाषा (30 गुण)
यामध्ये मराठी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न
विचारले जातात.
3. इंग्रजी व्याकरण (30 गुण)
यामध्ये इंग्रजी व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न
विचारले जातात.
4. गणित (30 गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
5.परिसर अभ्यास (30 गुण)
यामध्ये परिसर अभ्यास, विज्ञान, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र पाठ्यपुस्तकांवर आधारित
बेसिक प्रश्न विचारले जातात.
परीक्षभिमुख दृष्टीकोनासाठी मागील प्रश्नपत्रिका सराव अत्यंत आवश्यक
TET पेपर एकच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती व
अभ्यासाचा परीक्षाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकांचे
विश्लेषण करणे, प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत
सोडविण्याचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. 2013 ते
2019 पर्यंत TET परीक्षा 6 वेळा आयोजित करण्यात आली होती, या परीक्षेच्या 6 प्रश्नपत्रिका समजून घेऊन अभ्यासास
सुरवात केल्यास परीक्षाभिमुख अभ्यास होईल, तसेच
परीक्षेसाठी कोणते घटक महत्वाचे आहे, ते
लक्षात येईल.
(2)TET पेपर 2 अभ्यासक्रम,तयारीची दिशा
1.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (30 गुण)
यामध्ये बालकांच्या मानसशास्त्रावर
आधारित 11 ते 14 वर्षे वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यात अध्ययन, अध्यापन,विशेष बालकांच्या गरजा, शालेय
आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व
शैक्षणिक मूल्यमापन यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो.
2. मराठी भाषा (30 गुण)
यामध्ये मराठी
व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
3. इंग्रजी व्याकरण (30 गुण)
यामध्ये इंग्रजी
व्याकरण/उतारे/कविता/लेखक अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
4.गणित व विज्ञान (60 गुण)
यामध्ये गणितासाठी 30 व विज्ञान साठी 30
गुण आहेत.
4.1- गणित (30 गुण)
यामध्ये विविध गणितीय घटकांवर आधारित
प्रश्न विचारले जातात.
4.2- विज्ञान (30 गुण)
विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व आरोग्यशास्त्र यावरील
मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारले
जातात.
5.सामाजिकशास्त्र इतिहास व भूगोल (60 गुण)
5.1- इतिहास (30 गुण)
इतिहासात प्राचीन,
मध्ययुगीन व आधुनिक भारत यावर आधारित
मूलभूत प्रश्न विचारले जातात.
5.2 - भूगोल (30 गुण)
भूगोल विषयात महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल , जगाचा भूगोलचे बेसिक प्रश्न विचारले
जातात.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ची नोंदणी व अर्ज कसा भरावा.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.