Rangotsav 2023- 24 प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन २०२३-२४


अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे या उद्देशाने रंगोत्सव २०२३-२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रंगोत्सव कार्यक्रमात, सादरीकरण करण्याच्या दृष्टीने शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी/शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खुला आहे. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळांनी

Arts Integration, 

Sports Integration, 

Toy Based Pedagogy,

Story Telling 

या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांना विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ

https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6 

या लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करावयाचे आहेत.

दि. ७ मार्च २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरून वरील ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक या प्रमाणे व्हिडीओची लिंक दि. ७ मार्च २०२४ पर्यंत लिंकवर पेस्ट करणे अपेक्षित आहे.

तद्नंतर लिंकवर प्राप्त व्हिडीओंचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर ३ परीक्षकांची एक समिती गठीत करून उत्कृष्ठ व्हिडीओंची निवड करण्यात येऊन दि. १८ व १९ मार्च रोजी राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल.

राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास, विविध उत्कृष्ट कृतीं पैकी उत्तम सादरीकरण, उत्तम परिणामकारकता, गटातील एकसंघ भावना इत्यादी करिता प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील. राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.

शासनाचे परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

0 Comments