SIR 2026: मतदारांच्या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे | गणना प्रपत्र, कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती.

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे एसआयआरबाबत उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्न / शंका आणि त्यांना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिलेली ही उत्तरे.

SIR 2026 - Question and answers

एसआयआरमध्ये नोंदणीला दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात.

एसआयआरबद्दल शंका अन् त्याची थेट उत्तरे...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे काय व त्याचा उद्देश काय आहे?

उत्तर - राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषरहित व अचूक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच एसआयआर. दि. ८ ऑगस्टपर्यंत बीएलओ हे मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत.

गणना प्रपत्रामध्ये कोणती माहिती भरावयाची आहे?

उत्तर - मतदाराची सध्याच्या मतदार यादीतील माहिती पहिल्या भागात नमूद असणार आहे. दुसऱ्या भागात स्वतःचे किंवा आई-वडील / आजी-आजोबांचे नाव मागील एसआयआरच्या यादीतील तपशील मोजावे. तिसऱ्या भागात मतदारांची जन्मतारीख, मोबाईल क्र., आधार क्र. वडील / आई ही माहिती भरून स्वाक्षरी करावयाची आहे.

मागील एसआयआरमधील नोंदीशी जुळवणी झालेली नसेल तर अशा प्रकरणी काय कारवाई अपेक्षित आहे?

उत्तर - २००२ मधील मतदारयांद्यांच्या आधारे मतदारांना त्यांच्या २००२ मधील निवासासंदर्भातील माहिती देऊन त्याआधारे भारत निवडणूक आयोगाच्या ईएसआयनेट ॲप किंवा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावरून त्यांनी मागील एसआयआरमधील माहिती उपलब्ध करून देऊ शकेल. मतदार स्वतः सुद्धा ही माहिती वरील ॲप / संकेतस्थळावरून संकलित करून देऊ शकेल.

बीएलओंच्या घरभेटीच्या वेळी मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही प्रौढ सदस्य उपलब्ध नसतील तर अशा व्यक्तींचे गणना प्रपत्र कसे भरता येईल?

उत्तर - मतदार यादीमध्ये नमूद पत्त्यावर बीएलओ तीनवेळा भेट देईल. पहिल्या भेटीत संबंधित मतदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट न झाल्यास किंवा सदर घर बंद अवस्थेत असल्यास बीएलओचा दूरध्वनी क्रमांक दरवाजात सरकवून देण्यात येईल.

तीन भेटींनंतरही न भेटलेल्या मतदाराच्या अनुपस्थितीमुळे किंवा घर बंदमुळे गणना प्रपत्र भरून घेता न आल्यास काय होईल? २००२ च्या मतदार यादीशी जुळवणी झाली नसेल काय?

उत्तर - अशा मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीमध्ये समाविष्ट होणार नाहीत. मतदाराला गणना प्रपत्र भरून व त्यावर स्वाक्षरी करून द्यावा लागेल. ज्यांचे मागील एसआयआर नोंदीशी मॅच झालेली नसेल त्यांना आयोगाने निश्चित केलेल्या दस्तऐवजांपैकी एक वैध दस्तऐवज शोधून ठेवावे लागेल. जुळवणी न झालेल्या मतदारांनेदेखील आपला गणना प्रपत्र सही करून बीएलओकडे द्यावयाचा आहे. त्याचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. तथापि, त्यानंतर त्यांना आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सादर दिल्यानंतर त्याचे नाव अंतिम यादीत येईल.

मतदारांना वरील सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील का?

उत्तर - नाही. मतदाराने पात्रता सिद्ध करण्यासाठी फक्त एकच वैध कागदपत्र सादर करणे पुरेसे आहे. होय, ही सुविधा ईएसआयनेट ॲप किंवा https://voters.eci.gov.in/ वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शहरांमध्ये दिवसभर घरी नसतात. अशा मतदारांची पडताळणी कशी होणार?

उत्तर - यासाठी बीएलओंना गरजेनुसार संध्याकाळच्या वेळीही घरभेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ईएसआयनेटमधील 'बुक ए कॉल' सुविधेचा वापर मतदार करू शकतात. ज्या मतदारांचे गणना प्रपत्र विहित कालावधीत मतदान बीएलओकडे जमा होणार नाही, अशा व्यक्तींचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही.

प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या व्यक्तींच्या नावांची यादी कुठे पाहता येईल?

उत्तर - अशा व्यक्तींच्या नावांच्या याद्या त्यांच्याबाबतच्या कारणांसह सार्वजनिक कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना (बीएलए) सुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील.

एसआयआरमुळे मतदारांची नावे कमी होणार आहेत असा शंका उपस्थित केल्या जातात, हे खरे आहे का?

उत्तर - कोणताही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाणार नाही.

नागरिकांकडून काय अपेक्षित आहे? नवमतदारांचे काय?

उत्तर - नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन संपूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. सर्व नवमतदारांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संधी मिळेल. त्यासाठी फॉर्म ६ भरावा.

मतदारांसाठी महत्वाचे.

👇👇👇

सन 2002 च्या मतदार यादीत घरबसल्या एका मिनिटात नाव शोधा.


मोबाईलवरून 5 मिनिटात SIR Enumeration form भरा.

Post a Comment

0 Comments