बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेत युडायस पोर्टलवर खालील पद्धतीने Attach करावे.
👉प्रथमतः युडायस पोर्टलवर Teacher Module वर खालील लिंक ने लॉगिन करावे.
https://udiseplus.gov.in/udiseteacher/home
👉Login झाल्यावर आपल्याला Total आणि Incomplete शिक्षकसंख्या दिसेल त्यापैकी INCOMPLETE संख्येवर क्लिक करावे.
👉 आता आपल्यापुढे शिक्षकांची नावे आलेली असतील त्यापैकी ज्या शिक्षकांची शाळेतून बदली झालेली आहे त्यांच्या नावापुढे शेवटच्या रकान्यात Left हा पर्याय उपलब्ध आहे त्यावर क्लिक करावे.
👉नंतर Remark मध्ये Transfer हा पर्याय निवडावा व दिनांक मध्ये कार्यमुक्त झाल्याचा दिनांक टाकावा.
👉 हे करत असताना शिक्षकाच्या नावाखाली असणारा त्यांचा नॅशनल कोड नमूद करून ठेवावा. नाही ठेवला तरीही नंतर तो आपल्याला inactive Teacher या टॅब मधून मिळवता येईल. अशा पद्धतीने बदली झालेल्या शिक्षकांना Detach करता येईल
👉नंतर नवीन शाळेत हजर झालेल्या शिक्षकांना तिथेच DASHBOARD वर IMPORT ही टॅब उपलब्ध आहे त्यामधून आपल्याला त्यांचा नॅशनल कोड व जन्मतारीख टाकून Import करता येईल.
ही प्रक्रिया करत असताना कार्यमुक्त दिनांक व हजर दिनांक बरोबर टाकावा.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.