Teacher Transfer 2023-24 शिक्षक बदली सुधारित धोरणात होणार २६ संक्षिप्त बदल ?

जिल्हा परिषद शिक्षकांच्या होऊ घातलेल्या सुधारित बदली धोरणात बदली अभ्यास गटाने आपल्या अहवालात काही संक्षिप्त बदल /सुधारणा सुचविल्या आहेत.


         सुधारित बदली धोरणाकरिता शिक्षक संघटना , शिक्षक व नागरिकांनी शासन निर्णय ७ एप्रिल २०२१ मध्ये जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ४७१९ व आंतरजिल्हा बदलीसाठी ४१९९ अपेक्षित बदल/सुधारणा अभ्यास गटाकडे लेखी सुचविण्यात आलेल्या होत्या. या सर्व सूचनांचा अभ्यास करून जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीसाठी सुधारित धोरणात २३ संक्षिप्त बदल करण्यात आलेले आहेत.

महिला शिक्षिकांची दुर्गम भागात नियुक्ती पासून सुटका नाही.

         एप्रिल अखेर पर्यंत अंतिम अहवाल शासनास सादर होणार असून तदनंतर मंत्री महोदय यांचे संमतीने दोन्ही बदली बाबतचे सुधारित धोरण ( शासन आदेश ) निर्गमित होणार आहेत. १ मे २०२३ नंतर हे सुधारित धोरण निर्गमित होण्याची शक्यता आहे.

मा. आयुष प्रसाद यांनी बदली प्रक्रियेबाबत दिलेली प्रतिक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

         शिक्षक बदलीचे सुधारित धोरण निर्गमित झाल्यावर संगणकीय प्रणाली नव्याने बदलासह विकसित होणार आहे. या विकसित संगणकीय प्रणालीचा डेमो घेऊनच प्रणाली अंतिम होणार आहे. सुधारित धोरणानुसार संगणकीय प्रणाली विकसित झाल्यावर प्रथम आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होणार असून यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. मे २०२३ मध्ये बदली प्रक्रिया सुरु होणार असून ती जून अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याकरिता शासन आदेशात बदलीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेत प्रामुख्याने दुर्गम भागातील शिक्षकांच्या प्राधान्याने बदल्या बाबत बदल करण्यात आलेले आहेत.

      जिल्हा परिषद शिक्षकांच्या होऊ घातलेल्या सुधारित बदली धोरणात बदली अभ्यास गटाने आपल्या अहवालात खालील २६ संक्षिप्त बदल /सुधारणा सुचविल्या आहेत.

Post a Comment

0 Comments