स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्धार केला असून दि. १५ ऑगस्ट, २०२३ पूर्वी सदर पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दि. २१ ऑक्टोबर २०२२ व दि. १५ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे. सदर जाहिरातीद्वारे सर्व जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण १८,९३९ पदे भरली जाणार आहेत.
दि. १६ मार्च, २०२३ च्या शासन निर्णयान्वये दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
तसेच, माहे मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, अशा सर्व उमेदवारांना दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र करण्यात आले आहे. तसेच, मार्च, २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता ही पुढील फक्त एका परीक्षेसाठी कायम ठेवण्यात आली आहे.
सदर पद भरती मध्ये कोणकोणत्या पदांची भरती होणार आहे. त्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे याबाबतची सविस्तर माहिती आणि इतरही सूचना खालील pdf मध्ये आपणास पाहण्यास मिळतील.
.jpeg)
0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.