जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी- 2023
वर्ग 6 वी मध्ये प्रवेशा करिता
जवाहर नवोदय विद्यालय मध्ये
शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या वर्ग 6 वी तील प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय, निवड चाचणी- 2023 ही शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता सर्व जवाहर नवोदय विद्यालयांसाठी एकाच वेळी घेण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तिथी 31 जानेवारी 2023 ही आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 टक्के जागा ग्रामीण उमेदवारांना देण्यात येतील आणि उरलेल्या जागा त्याच जिल्ह्यातील शहरी विभागातून भरण्यात येतील.
· उमेदवाराने तिसरी, चौथी आणि पाचवी यातील शैक्षणिक वर्षातील एक दिवस जरी शहरी भागात असलेल्या शाळेतून अध्ययन केले असेल तर त्याला शहरी विभागातील समजण्यात येईल.
Click Here For Download Prospectus 2023
प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? याबाबत मदत हवी असल्यास या लेखाच्या शेवटी व्हिडीओ दिलेला आहे. आवश्य पहा.
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी
2023 साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया
(i) जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन द्वारे सोपी केली आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी नवोदय विद्यालय
समिती च्या एडमिशन पोर्टल द्वारे www.navodaya.gov.in या संकेत स्थळावर विनामूल्य करता येईल. उमेदवाराचे निवास
(ग्रामीण/शहरी), वय, शैक्षणिक पात्रता, इ. साठी पुराव्याची विस्तृत आणि
सविस्तर तपासणी फक्त निवड झालेल्या उमेदवारांचीच केली जाईल.
(ii)
खालील कागदपत्रे सॉफ्ट फॉर्म मध्ये
(10 ते 100 kb मधील आकाराचे JPG फॉरमॅट) नोंदणीसाठी
तयार ठेवणे आवश्यक आहे.
a.
मुख्याध्यापकांनी सत्यापित केलेले उमेदवाराचे
तपशील नमूद असणारे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र (प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.)
b.
उमेदवाराचा फोटो
c.
पालकांची स्वाक्षरी
d.
उमेदवाराची स्वाक्षरी
e.
आधार तपशील/ सक्षम शासकीय अधिकार्याने
जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र.
(iii)
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज
करतांना योग्यरित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वतःचे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र
आणि स्वतःची तसेच पालकाची स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र ( jpeg स्वरूपात, 10kb ते 100kb या दरम्यानचे ) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे.
(iv)
राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन
शिक्षण संस्था (N.I.O.S.) च्या पात्र उमेदवारांनी 'बी' प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे
आणि त्यांच्या राहण्याचा तोच जिल्हा असावा ज्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात
तो/ती प्रवेश घेऊ इच्छित आहे.
(v)
अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
खुली, सोपी, मुक्तस्त्रोत आणि विनामूल्य आहे.
डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाइल, टॅब्लेट इत्यादी कोणत्याही
स्त्रोतांकडून अर्ज सबमिट केला जाऊ शकतो.
(vi)
सर्व ज.न.वि. मध्ये अर्ज
करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खुली सोपी व विनामूल्य करण्यासाठी मार्गदर्शन मंच सुरु
करण्यात आलेले आहेत. इछुक पालकांनी आपल्या पाल्याच्या सोबत अर्ज करतांना लागणारी आवश्यक ती
कागदपत्रे फोटो, प्रमाणपत्र, मोबाइल फ़ोन, चालू मोबाइल क्रमांक (नोंदणी
क्रमांक व पासवर्ड मिळविण्याकारिता) घेऊन संपर्क करावा.
प्रवेशपत्रे वितरण
·
प्रवेशपत्रे नवोदय विद्यालय समितीने
निश्चित केलेल्या तारखेनुसार उपलब्ध करुन दिली जातील जी एडमिशन पोर्टल वरून उपलब्ध
होतील. प्रवेशपत्रे जवाहर नवोदय विद्यालय, निवड चाचणी पूर्वी उमेदवार /
पालकांनी विनामूल्य डाउनलोड केली पाहिजेत.
निवड चाचणीचा निकाल
·
जे एन व्ही निवड चाचणी 2023 चा निकाल
जून 2023 पर्यंत
जाहीर होणे अपेक्षित आहे. उमेदवार प्रवेश पोर्टल वरून निकाल घेऊ शकतात. त्याच
प्रमाणे निवड चाचणीचा निकाल संबंधित ज.न.वि. साठी खालील
कार्यालया मध्ये प्रदर्शित केला जाईल.
1. जवाहर नवोदय विद्यालय
2. जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालय
3. जिल्हा दंडाधिकारी कार्यालय
4. उपायुक्त नवोदय विद्यालय समिती संभागीय कार्यालय
5. नवोदय विद्यालय समिती च्या www.navodaya.gov.in संकेत स्थळ
6. प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय यांच्याकडून संबंधित उमेदवारांना शीघ्र
डाकेद्वारे (स्पीड पोस्ट) व नोंदणीकृत फोन वर SMS द्वारा कळवले जाईल.
निवड आणि प्रवेश
·
परीक्षेतील निवडी मुळे ज.न.वि. मध्ये
प्रवेश मिळविण्याचा उमेदवाराचा कोणताही हक्क होत नाही. वास्तविक प्रवेश घेण्याच्या
वेळी प्रत्येक निवड झालेल्या उमेदवारास सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करावी
लागतील, जी नवोदय विद्यालय समितीने ठरवून दिली आहेत. प्रवेश निश्चित
होईपर्यंत निवड केवळ तात्पुरती आहे. उमेदवारास असा सल्ला देण्यात येत आहे की, संबंधित ज. न.वि. द्वारे कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चित
झाल्यावरच आपल्या शाळेतून टी सी करिता अर्ज करावा.
·
कुठल्याही तक्रारीच्या संदर्भात नवोदय
विद्यालय समितीचा निर्णय हा अंतिम राहील व तो उमेदवारास बंधनकारक राहील.
·
निवड झालेल्या व निवड न झालेल्या
उमेदवारांचे गुण कळविले जाणार नाहीत.
·
उत्तरपत्रिकेची फेरतपासणी करण्याची
तरतूद नाही. संगणकावर निकाल तयार होत असल्यामुळे पुन्हा गुणांची बेरीज तपासली जात नाही.
कारण निकाल तयार करताना प्रत्येक पायरीची काटेकोरपणे तपासणी करण्याची काळजी घेण्यात
येत असते.
·
उमेदवार आणि त्यांचे पालक यांनी हे
देखील लक्षात घेतले पाहिजे की एन व्ही एस योजने अंतर्गत इयत्ता नववी मध्ये
विद्यार्थी असतांना एका शैक्षणिक वर्षासाठी हिंदी भाषिक राज्यामध्ये असलेल्या जे
एन व्ही च्या विद्यार्थ्यांना गैर हिंदी भाषिक राज्यात दुसऱ्या जे एन व्ही मध्ये
स्थलांतर करावे लागेल आणि त्या उलट गैर हिंदी भाषिक राज्यामध्ये असलेल्या जे एन
व्ही च्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषिक राज्यात दुसऱ्या जे एन व्ही मध्ये स्थलांतर
करावे लागेल. स्थलांतर करण्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांनी / पालकांनी नकार
दिल्यास जे एन व्ही मध्ये अशा विद्याथ्र्यांना पुढे शिक्षण सुरू ठेवण्यास परवानगी
दिली जाणार नाही.
·
विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात
येते की निवड झालेल्या विद्यार्थ्याला ज्या जिल्ह्यातून तो परीक्षेला बसला असेल त्या
जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय येथे त्याला प्रवेश दिला जाईल. कोणत्याही कारणास्तव
निवड झालेल्या विद्यार्थ्याला दुसऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दिला जाणार
नाही. शिक्षणाच्या माध्यमाच्या कारणास्तव अथवा पालकांची बदली अन्य जिल्ह्यात किंवा
राज्यात झाली या कारणास्तव विद्यार्थ्यांची बदली दुसऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात
करण्याच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.
·
निवड झालेल्या अनु.जाति (SC), अनु.जमाती (ST) व इतर मागासवर्गीय (OBC) संवर्गातील उमेदवारांना प्रत्यक्ष प्रवेश घेते वेळी जात प्रमाण पत्र
सादर करावे लागेल. निवड झालेल्या इतर मागासवर्गीय (OBC) संवर्गातील उमेदवारांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग मार्फत विहित
नमुन्यात असलेले ओबीसी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (नमुना संलग्न) अशी
प्रमाणपत्रे ज्या वर्षात प्रवेश घ्यावयाचा आहे त्याच्या 30 मार्च
पर्यंत सक्षम अधिकाऱ्याकडून मिळवलेली असली पाहिजेत म्हणजेच ती त्यांना प्रवेश
घेतेवेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांना सादर करणे शक्य होईल.
उदाहरणार्थ शैक्षणिक सत्र 2023-24 करिता
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता संबंधित प्रमाणपत्रे 30 मार्च 2023 पर्यंत मिळवलेली असली पाहिजेत.
·
जे उमेदवार ग्रामीण जागेमधून प्रवेश
घेऊ इच्छितात त्यांनी तिसरी, चौथी व पाचवी इयत्ता शासकीय/
शासनमान्य/शासन संलग्न प्रमाणित ग्रामीण शाळेमधून पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिक्षण
घेतले आहे असे प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून घेऊन प्रवेश घेतेवेळी सादर
करावे.
·
अपंग संवर्गातील (अस्थिव्यंग अपंगत्व, कर्णबधीर / बहिरेपणा दृष्टीचे अपंगत्व) उमेदवारांनी निवड झाल्यास प्रवेश घेतेवेळी संबंधित जिल्ह्याच्या मुख्य वैद्यकीय
अधिकाऱ्याची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र नियमित प्रारुपात सादर करावे.
·
तृतीयपंथी उमेदवारांना निवड झाल्यास
संबंधित राज्याच्या सक्षम अधिकाऱ्याचे तृतीयपंथी असल्याचे प्रमाण पत्र सादर करावे
लागेल. या संवर्गातील उमेदवारासाठी राखीव जागेची तरतूद केलेली नाही.
उमेदवारासाठी पात्रता (कोण पात्र
आहे?)
सर्व उमेदवारांसाठी:
1) ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय
विद्यालय आहे त्याच जिल्ह्यातील उमेदवार प्रवेश परीक्षेला पात्र समजण्यात येतील.
तथापि ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु झाले व त्या जिल्ह्याची नंतर
विभागणी झाली असेल व नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरु झाले नसेल तर
विद्यालय प्रवेश पात्रतेचा विचार करतांना जुन्या जिल्ह्याची सीमा विचारात घेतली
जाईल.
2) प्रवेश परीक्षा देणाऱ्या
उमेदवाराचा जन्म 01-05-2011 पूर्वी व 30-04-2013 (दोन्ही दिवस धरून) नंतर झालेला
नसावा. ही अट अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीं, इतर मागासवर्गीय (OBC) च्या उमेदवारांसह सर्व
उमेदवारांना लागू राहील, प्रवेश घेणाऱ्या उमेदवाराच्या वयाबाबत शंका असल्यास सदरची बाब
वैद्यकीय मंडळाकडे वयाचे निश्चितीकरण करण्यास्तव मांडली जाईल. वैद्यकीय मंडळाने
दिलेला निर्णय अंतिम राहील.
3) निवड चाचणीसाठी बसणारा उमेदवार
हा तो ज्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छित असेल, त्याच जिल्ह्यातील सरकारी /
निमसरकारी अनुदानित / मान्यताप्राप्त शाळेत किंवा राष्ट्रीय मुक्त शिक्षण
संस्थेच्या "ब" वर्गातील शाळेत इयत्ता पाचवीमध्ये संपूर्ण शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये शिकत असला पाहिजे. जे विद्यार्थी यापूर्वीच्या शैक्षणिक सत्रात
इयत्ता पाचवी शिकत होते किंवा इयत्ता पाचवी उत्तीर्ण झाले असतील तर ते या प्रवेश
निवड चाचणी करिता पात्र राहणार नाहीत. एखाद्या शाळेस शासन किंवा शासकीय प्राधिकरण
यांची मान्यता असेल तर ती शाळा मान्यताप्राप्त समजली जाईल. तसेच शासन / शासकीय
प्राधिकरणाद्वारा प्रायोजित शाळा तसेच राष्ट्रीय मुक्त विद्यालये संस्थेने दर्जा
दिलेल्या मुक्त शाळा याही मान्यता प्राप्त समजण्यात येतील. जवाहर नवोदय विद्यालय
प्रवेशासाठी विद्यार्थी हा अशा शाळांमधून इयत्ता पाचवी 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाला पाहिजे. तरच इतर अटींच्या अधीन राहून 2023-24 मध्ये त्याला इयत्ता सहावी करिता प्रवेश दिला जाईल.
4) जे उमेदवार ग्रामीण जागेमधून
प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी तिसरी, चौथी व पाचवी इयत्ता शासकीय/ शासनमान्य / शासन संलग्न प्रमाणित
ग्रामीण शाळेमधून पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिक्षण घेऊन सलग उत्तीर्ण झाले असले
पाहिजे.
5) जे विद्यार्थी राष्ट्रीय मुक्त
शिक्षण संस्थान चे बी सर्टिफिकेट घेऊन इयत्ता पाचवी उतीर्ण होतील त्यांनाही
परीक्षेला बसता येईल. त्यांना वयाची अट इतर विद्यार्थ्यांप्रमाणे राहील. असे
विद्यार्थी मागील तीन वर्षे ग्रामीण भागात राहत असतील, तर त्यांचा ग्रामीण स्तर मा.
तहसीलदार किंवा मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावर अवलंबून राहील. जे
विद्यार्थी वरील योजनेंतर्गत शहरी किंवा निश्चित केलेल्या भागात येत असतील ते ग्रामीण आरक्षणास पात्र राहणार
नाहीत.
6) उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत
दुसऱ्यांदा प्रवेश चाचणीस बसता येणार नाही.
ग्रामीण उमेदवारांसाठी:
अ) प्रत्येक
जिल्ह्यातील किमान 75 टक्के जागा ग्रामीण उमेदवारांना देण्यात येतील
आणि उरलेल्या जागा त्याच जिल्ह्यातील शहरी विभागातून भरण्यात येतील.
ब) ग्रामीण जागेसाठी इच्छुक
उमेदवाराने ग्रामीण विभागातून तिसरी, चौथी आणि पाचवी इयत्ता (सलगपणे) प्रत्येक वर्षी
पूर्ण शैक्षणिक वर्ष भरून शासनमान्य शाळेतून अभ्यास केला असल्यास ग्रामीण
जागांसाठी त्याच्या अर्जाचा विचार केला जाईल. तथापि असा उमेदवार इयत्ता पाचवी
त्याच जिल्ह्याच्या शाळेत शिकत असला पाहिजे ज्या जिल्ह्याच्या जवाहर नवोदय
विद्यालयात त्याला प्रवेश घेण्याची इच्छा आहे.
क) ज्या उमेदवारांनी राष्ट्रीय
मुक्त शिक्षण संस्था यामधून शिक्षण घेतले असेल त्यांनी मा. जिल्हाधिकारी/ मा.
तहसीलदार किंवा मा.गटविकास अधिकारी यांचे ग्रामीण
भागात राहत असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
शहरी उमेदवारासाठी:
उमेदवाराने तिसरी, चौथी आणि पाचवी यातील शैक्षणिक
वर्षातील एक दिवस जरी शहरी भागात असलेल्या शाळेतून अध्ययन केले असेल तर त्याला
शहरी विभागातील समजण्यात येईल. शासकीय परिपत्रकानुसार शहरी म्हणून जाहीर
झालेल्यास शहरी मानले जाईल. इतर सर्व विभाग ग्रामीण समजले जातील.
तृतीयपंथी उमेदवारासाठी
तृतीयपंथी उमेदवारांसाठी वेगळ्या
राखीव जागा नसून त्यांना मुलांच्या गटातून अर्ज करता येईल. ग्रामीण, शहरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग
संवर्गातील राखीव जागा मुलांप्रमाणे ग्राह्य धरण्यात येतील.
जागांचे आरक्षण
अ) प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 टक्के जागा
ग्रामीण उमेदवारांना देण्यात येतील आणि उरलेल्या जागा त्याच जिल्ह्यातील शहरी
विभागातून भरण्यात येतील.
ब) अनुसूचित जाती व अनुसूचित
जमातीसाठी असणाऱ्या राखीव जागेचे प्रमाण हे पूर्ण जिल्ह्यातील लोकसंखेच्या
प्रमाणात आहे परंतु कोणत्याही जिल्ह्यात हे प्रमाण राष्ट्रीय प्रमाण सरासरीपेक्षा
( अनुसूचित जाती 15% व अनुसूचित जमाती 7.5% ) कमी असणार नाही. परंतु
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी (दोन्ही वर्गाचे एकत्रित ) कमाल
राखीव जागा 50% राहतील.
विशेष परिस्थिती अंतर्गत या दोन्ही मधील राखीव जागांच्या प्रमाणात अंतर्गत बदल
केला जाऊ शकतो, याहून अधिक उमेदवारांची निवड खुल्या प्रवर्गात केली जाईल.
क) इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना अनु.जाती आणि
अनु.जमाती च्या आरक्षणाच्या वरील आणि त्याहून अधिक 27% आरक्षण दिले जाईल. ओबीसी विद्यार्थ्यांना
देण्यात येणारी आरक्षण वेळोवेळी केंद्रीय यादीनुसार लागू केली जाईल. केंद्रीय
यादीमध्ये समाविष्ट न केलेले ओबीसी उमेदवार सामान्य उमेदवार म्हणून अर्ज करतील.
ड) एकूण जागांपैकी 1/3 जागा
मुलींसाठी राखीव आहेत.
ई) “ दिव्यांग " उमेदवारांसाठी
शासकीय नियमानुसार राखीव जागांची तरतूद आहे. (ज्या अंतर्गत अस्थिव्यंग अपंगत्व, कर्णबधीर/बहिरेपणा, दृष्टीचे अपंगत्व यांचा समावेश
आहे.)
* दृष्टीचे अपंगत्व म्हणजे खालील दिलेल्या
स्थितीप्रमाणे जर :
अ) संपूर्ण दृष्टिहीन किंवा.
आ) दृष्टीदोष घालविण्याकरिता
वापरण्यात येणाऱ्या चष्म्याचा नंबर चांगल्या डोळ्यामध्ये 6/60 किंवा 20/200 (Snellen) या पेक्षा जास्त नसावा किंवा, इ) दृष्टीची मर्यादा 20 डिग्री कोन
किंवा त्यापेक्षा अधिक नसावी.
* कर्णबधीर / बहिरेपणा म्हणजे 60 डेसीबलची
ध्वनी किंवा संभाषण ऐकण्याची क्षमता या पेक्षा जास्त असावी.
* स्थलांतराचे पंगुत्व म्हणजे
अस्थिसांध्याचे पंगुत्व किंवा शरीरातील अवयवांचे सुरळीतपणे हालचाल करण्यास अडचणी निर्माण
होणे किंवा सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा अर्धांगवायू).
* व्यक्तीला असलेले अपंगत्व म्हणजे
संबंधित व्यक्तीला 40 टक्के पेक्षा कमी अपंगत्व नाही. असे कायदेशीर प्रमाणपत्र वैद्यकीय
अधिकाऱ्याने दिले असले पाहिजे.
निवड झाल्यास सादर करावयाची
प्रमाणपत्रे
उमेदवाराची प्रवेश चाचणीद्वारे
तात्पुरती निवड झाल्यास प्रत्यक्ष प्रवेश घेते वेळी
प्रमाणपत्र/कागदपत्रांची पूर्तता
करावी लागेल.
i. जन्मतारखेचा पुरावा.
ii. नवोदय विद्यालय समितीच्या
नियमानुसार योग्यता प्रमाणपत्रे
iii. ग्रामीण विभागातून प्रवेश
घेणाऱ्या उमेदवाराच्या पालकांनी त्यांचा पाल्य ग्रामीण भागातून शिकला असल्याचे सक्षम प्राधिकरण
अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
iv. केवळ राष्ट्रीय मुक्त शिक्षण
संस्था यामधून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या
प्रारूपानुसार रहिवाशी प्रमाणपत्र
V. रहीवाशी
दाखला, आधार कार्ड व इतर संबंधित कागदपत्रे.
परीक्षा केंद्र
उमेदवाराच्या प्रवेशपत्रावर जे
परीक्षा केंद्र नोंदविलेले आहे त्याच परीक्षा केंद्रावर त्याला परीक्षा द्यावी
लागेल. नोंदविल्या गेलेल्या केंद्राव्यतिरिक्त इतर केंद्रावर त्याला परीक्षा देता
येणार नाही. कोणत्याही कारणास्तव एकदा दिलेले परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती
मान्य होणार नाही. कोणत्याही उमेदवाराला योग्य प्रवेशपत्राशिवाय चाचणी परीक्षेला
बसता येणार नाही. प्रवेश पत्र नवोदय विद्यालय समिती मुख्यालयाच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरून प्रवेश पोर्टल
च्या माध्यमातून डाऊनलोड करता येईल.
निवड चाचणीचे प्रारूप
निवड चाचणी ही सलग दोन तासाची
असेल व ती स. 11:30 ते दु.01:30 या वेळेत
घेण्यात येईल. यात तीन विभाग असून सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील.
तीनही विभाग मिळून 100 गुणांचे चाचणी चा प्रकार 80 प्रश्न
असतील.
तीनही विभाग एकाच पुस्तिकेमध्ये
समाविष्ट असलेली एक चाचणी पुस्तिका प्रत्येक उमेदवाराला पुरविण्यात येईल.
"दिव्यांग "(विशेष विद्यार्थी) उमेदवारांना अतिरिक्त 40 मिनिटे
कालावधी चा वेळ देण्यात येईल.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी
काही महत्वाच्या सूचना
जवाहर नवोदय विद्यालय निवड
चाचणीचा ऑनलाईन भरावयाचा अर्ज हा सुस्पष्ट व अगदी सरळ आहे. तरी अर्ज भरतांना पुढील सूचनांचे
पालन करावे.
1. अर्जाचा नमुना व माहितीपत्रक
कृपया काळजीपूर्वक वाचा. संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व पूर्णपणे भरा. अर्ज
भरण्यापूर्वी उमेदवाराचा जन्म (01.05.2011 ते 30.04.2013) या कालावधीत झाला आहे याची खात्री करून घ्या. तसेच इतर पात्रता अटी
जसे इयत्ता 3,4,5 शासनमान्य /
शासन संलग्न/शासन प्रमाणित / राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्था मधील आहे याची
खात्री करून घ्या.
2. ऑनलाईन अपलोड करण्यासाठी लागणारी
कागदपत्रे जसे जातीविषयीची जसे सामान्य, अनु.जाति, अनु.जमाती, ओबीसी आणि दिव्यांग संवर्गाची, मुलगा/मुलगी तसेच शहरी/ग्रामीण
इत्यादींची माहिती असणारे प्रमाणपत्र तयार करून मगच अर्ज भरा. जर प्रवेश घेतेवेळी
या मध्ये तफावत आढळल्यास त्याची/तिची निवड अपात्र ठरू शकते.
3.
अ) प्रवेश अर्जातील जन्मदिनांक
आकड्यात आणि अक्षरी दोन्ही पद्धतीने लिहा. शाळेतील नोंदीनुसार तो बिनचूक लिहा.
जन्मदिनांक शाळेतील नोंदीपेक्षा भिन्न आढळल्यास त्या उमेदवाराचा प्रवेश रद्द होऊ
शकतो.
ब) कायमस्वरूपी असणाऱ्या
जन्मखुणेचा उल्लेख प्रवेश अर्जामध्ये उमेदवाराने करणे आवश्यक आहे.
4. जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी
साठी अर्ज करतांना उमेदवाराची तसेच पालकाची स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे.
5. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2023 ही आहे.
सावधान:
अर्जातील कोणतेही सदर कोरे राहिल्यास अगर अपुरी /चुकीची माहिती भरल्यास तो अर्ज अपात्र समजून रद्द केला जाईल. उमेदवाराने अर्जातील सर्व अटींची पूर्तता (उदा: शिक्षण, वय,), विशेष संवर्ग (जसे अनुसूचित जाती / जमाती,अपंग), क्षेत्र (शहरी/ग्रामीण) या सर्व माहिती पूर्ण होत आहेत याची खात्री करून घ्यावी. उमेदवाराला प्रवेश मिळाल्यानंतर अर्जाची तपासणी करताना काही माहिती खोटी, अपुरी, भिन्न आढळल्यास त्याचा/तिचा प्रवेश रद्द करण्यात येईल. आणि याबाबतचा नवोदय विद्यालय समितीचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील. याबाबतचा कोणताही पत्रव्यवहार नंतर करण्यात येणार नाही. तसेच एखाद्या उमेदवाराने प्रवेश घेतेवेळी खोटी, चुकीची प्रमाणपत्रे शपथपत्र / माहिती दिल्याचे आढळून आल्यास त्याचा/तिचा प्रवेश रद्द करण्यात येईल व विद्यार्थ्याकरिता करण्यात आलेला सर्व खर्च नवोदय विद्यालय समितीच्या नियमानुसार वसूल केला जाईल.
ऑनलाईन फॉर्म कसा भरावा? या माहीतीसाठी खालील
व्हिडीओ पहा.


0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.