Sanch Manyata 2021-22 | संचमान्यता माहिती कशाप्रकारे भरावी ?

स्थानीक स्वराज्य संस्थेच्या तसेच अनुदानीत, विनाअनुदानीत, स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमधील शिक्षक संख्या निश्चीतीसाठी व जिल्हा परीषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीप्रक्रियेसाठी संचमान्यता अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी जबाबदारीपुर्वक सदर प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे.


संचमान्यता 2021-22 संदर्भातील माहिती कशाप्रकारे भरावी ?

१) सर्वप्रथम https://education.maharashtra.gov.in/ या ॲड्रेसवरुन School Portal  ओपन करा.

२) वेबसाईट ओपन झाल्यानंतर Sanch Manyata या टॅबवर क्लिक करा. आपल्या शाळेचा युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

३) लॉगिन झाल्यानंतर प्रथम आलेल्या सूचनांचे वाचन करुन OK बटनवर क्लिक करा.

३) त्यानंतर वरच्या पट्टीत दिसणार्‍या Working Post या Tab वर क्लिक करून प्रथम Working Staff Teaching  या टॅबवर क्लिक करा.

४) त्यानंतर आपल्या शाळेचे माध्यम निवडून 01/01/2022 रोजी कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती भरून प्रथम अपडेट करावी.

५) आपल्या शाळेत एकपेक्षा जास्त माध्यम असल्यास सर्व माध्यमांची माहीती भरुन अपडेट करावी. सर्व माध्यमांची माहीती भरुन अपडेट झाल्यानंतर व बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच Finalize करावी.

६) त्यानंतर Working Staff Non-Teaching  या टॅब वर क्लिक करून शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची माहिती भरावी.

७) शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची माहिती भरून प्रथम ती अपडेट करावी व नंतर Finalize करावी. अशाप्रकारे आपण आपल्या शाळेची संचमान्यता 2021-22 संदर्भातील माहिती भरून पूर्ण करावी.

विशेष सूचना-

सन २०२१-२२ च्या संच मान्यतेसाठी दि १.१.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त  शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Working Teaching  Staff वर क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update Finalize पूर्ण करून त्यानंतरच  Working Staff  Non-Teaching  ची नोंद पूर्ण करावी.

शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक या पदांचे संचमान्यता निकष

शिक्षकांच्या बदल्या मोबाईल ॲपच्या सहाय्याने ऑनलाईनच होणार

Post a Comment

1 Comments

Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.