बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी आल्यास शिक्षक पदे मंजूर करणे/ सुरु ठेवणे इत्यादी बाबतचे निकष विहित करण्यात आलेले आहेत.
लेखातील मुद्दे
- दि. 28/08/2015 च्या शासन निर्णयातील निर्देशानुसार
- शिक्षकांची पदे - प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा
- मुख्याध्यापक / उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांची पदे - प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, संयुक्त शाळा
- दि.02/07/2016 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश
- दि.01/01/2018 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश
- दि.13/07/2020 रोजीचे मा. शिक्षण आयुक्त यांचे मा. अपर मुख्य सचिव यांना लिहीलेले पत्र
-----------------------------------------------------------------------------------------------
दि. 28/08/2015 च्या शासन निर्णयातील निर्देश खालीलप्रमाणे आहेत
:
शिक्षकांची पदे :
प्राथमिक शाळा ( इयत्ता १ ली ते ४ थी
किंवा इयत्ता १ ली ते ५ वी)
- शाळेमधील सर्व विद्यार्थी मिळून ६० पर्यंत २ शिक्षक, त्यानंतर वाढ होणाऱ्या प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त शिक्षक.
- एखाद्या प्राथमिक शाळेत वर्ग ३ किंवा ४ किंवा ५ मध्ये एकाच वर्गात कमीत कमी २० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर त्या त्या वर्गासाठी वेगळे शिक्षक अनुज्ञेय राहतील. मात्र तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे संपूर्ण शाळेत शिकत असलेल्या एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संख्या यासाठी विचारात घ्यावयाची आहे.
- कोणत्याही शाळेत अतिरिक्त शिक्षक पद देय असताना त्या शिक्षकासाठी अतिरिक्त वर्गखोली असणे बंधनकारक राहील. वर्ग खोली नसल्यास शिक्षकाचे जादा पद मंजूर करण्यात येवू नये.
- वर्ग १ आणि २ मध्ये २० पेक्षा अधिक विद्यार्थी असले तरी बहुवर्ग अध्यापन पध्दतीने वर्ग चालवायचे आहेत. त्याप्रमाणे वर्ग ३,४ आणि ५ मध्ये प्रत्येकी २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास बहुवर्ग अध्यापन पध्दती वापरायची आहे.
उच्च प्राथमिक शाळा ( इयत्ता ५ वी ते ७
वी किंवा इयत्ता ६ वी ते ८ वी)
- नवीन शाळा सुरु होत असल्यास आणि पहिल्या वर्षी फक्त सहावा वर्ग असल्यास ३५ विद्यार्थ्यांसाठी २ शिक्षक (१ विज्ञान/गणित आणि १ भाषा) अनुज्ञेय राहील.
- सध्या अस्तित्वात असलेल्या अन्य शाळांमध्ये तीनही वर्ग मिळून ३६ पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास ३ शिक्षक ( १ विज्ञान / गणित, १ भाषा, १ समाजशास्त्र) अनुज्ञेय राहील.
- विद्यार्थ्यांची संख्या १०५ पेक्षा अधिक झाल्यास ३५ च्या पटीमध्ये १ अतिरिक्त शिक्षक अनुज्ञेय होईल. मात्र प्रत्येक शिक्षकासाठी एक वर्ग खोली असणे आवश्यक आहे. अन्यथा जादा शिक्षक पद मंजूर करु नये.
माध्यमिक शाळा ( इयत्ता ९वी ते १०वी )
- नवीन शाळा सुरु होत असल्यास त्यात फक्त ९ वा वर्ग राहील. किमान ४० विद्यार्थ्यांचा निकष राहील व त्यास २ शिक्षक ( १ विज्ञान/गणित +१ भाषा / समाजशास्त्र) अनुज्ञेय राहील.
- सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये इयत्ता ९वी व १० वी चे दोनही वर्ग मिळून ४० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास ३ (१ भाषा, १ विज्ञान / गणित, १ समाजशास्त्र) शिक्षक अनुज्ञेय राहतील.
- नववी किंवा दहावी कोणत्याही वर्गामध्ये ६० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एक शिक्षकाचे जादा पद अनुज्ञेय होईल व चाळीशीच्या पटीने विद्यार्थी संख्येस १ शिक्षक अनुज्ञेय राहील.
- मात्र, सुरुवातीच्या तीन शिक्षकांपेक्षा अतिरिक्त शिक्षक मंजूर करतांना प्रत्येक शिक्षकामागे एक अतिरिक्त वर्ग खोली उपलब्ध असणे आवश्यक आहे. अतिरिक्त वर्ग खोली उपलब्ध नसल्यास अतिरिक्त शिक्षक पद मंजूर करु नये.
- एखाद्या शाळेत तीन पेक्षा अधिक शिक्षक पद मंजूर झाल्यास इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, मराठी, शारिरीक शिक्षण व कार्यानुभव आणि इतर विषयांच्या शिक्षक संख्या समतोल ठेवून पुढची पदे मंजूर करावयाची आहेत.
मुख्याध्यापक /
उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांची पदे :
प्राथमिक शाळा (१ली ते ५ वी)
- विद्यार्थ्यांची संख्या १५० पेक्षा अधिक झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय होईल.
- सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १३५ पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही.
उच्च प्राथमिक शाळा (६वी ते ८वी)
- १०० पेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहील.
- सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही.
माध्यमिक शाळा ( वर्ग ९ वी व १० वी)
- १०० पेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहील.
- सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थीची संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही.
संयुक्त शाळा
- (i) वर्ग १ ते ७ (i) वर्ग १ ते ८ (ii) वर्ग १ ते १० (iv) वर्ग १ ते १२ (v) वर्ग ५ ते १० (iv) वर्ग ६ ते १० (vii) वर्ग ५ ते १२ (vii) वर्ग ६ ते १२ (ix) वर्ग ८ ते १२ (x) वर्ग ९ ते १२
- वरील पैकी कोणत्याही प्रकारच्या शाळांमध्ये शाळेचा वेग-वेगळा भाग समजून एकापेक्षा अधिक मुख्याध्यापक पदे अनुज्ञेय ठरत असल्यास फक्त वरिष्ठ शाळेमधील मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार आहे.
- सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या १०० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही.
पर्यवेक्षक /
उपमुख्याध्यापकांची पदे
- उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा ज्या संयुक्त शाळांमध्ये १५ पेक्षा अधिक शिक्षकांची पदे अनुज्ञेय असतील तेथे १ पर्यवेक्षकाचे पद देय ठरेल व शिक्षकांची संख्या ३० पेक्षा अधिक झाल्यास एक अतिरिक्त उपमुख्याध्यापक अनुज्ञेय ठरेल. अशा रितीने १५ शिक्षकांच्या मागे १ पर्यवेक्षकाचे पद मंजूर करावे, तथापि कोणत्याही शाळेत ४ पेक्षा अधिक पर्यवेक्षकांची पदे अनुज्ञेय असणार नाही.
- इयत्ता ५वी ते १०वी, इयत्ता ५वी ते १२वी, इयत्ता ८वी ते १०वी च्या शाळा या शाळांमधून वर्ग ५ किंवा वर्ग ८ कालांतराने बंद होणार आहेत. परंतू त्या शाळेत वर्ग ५ किंवा वर्ग ८ मध्ये २० पेक्षा अधिक मुले असल्यास ते वर्ग बंद न करता ती शाळा तशीच सुरु ठेवावी. त्या परिस्थितीत शिक्षक पद मंजूरीचे निकष खालील प्रमाणे राहील :
- वर्ग ५ विद्यार्थी संख्या २० ते ३० पर्यंत असल्यास १ शिक्षक अनुज्ञेय राहील. त्यानंतर ३० च्या पटीत १ अतिरिक्त शिक्षक अनुज्ञेय राहतील.
- वर्ग ८ मधील विद्यार्थी संख्या २० ते ३५ पर्यंत असल्यास १ शिक्षक अनुज्ञेय राहील व त्यानंतर ३५ च्या पटीत एक अतिरिक्त शिक्षक अनुज्ञेय राहतील. मात्र वर्ग ५ किंवा वर्ग ८ मध्ये कोणत्याही वर्षी विद्यार्थी संख्या २० पेक्षा कमी झाल्यास त्या वर्गाना शिक्षकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही इयत्ता ५वी ते १०वी किंवा ५वी ते १२वी आणि ८ वी ते १० वीच्या शाळेमधून ५ व्या किंवा ८व्या वर्गातील सर्व मुलांना इतर शाळांमध्ये एकदा समाविष्ट केल्यानंतर ती शाळा कायमची इयत्ता ६वी ते १०वी किंवा इयत्ता ६वी ते १२वी किंवा इयत्ता ९वी ते १०वी ची होणार आहे.
थोडक्यात महत्वाचे :
- तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे ज्या त्या वर्गामध्ये निकषापेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास जादा शिक्षक पद देण्यात येईल. तथापि अशा अतिरिक्त शिक्षकाने वर्ग भरविण्याकरीता त्या शाळेने अतिरिक्त खोली बांधल्यानंतरच ते पद भरण्याची परवानगी देण्यात येईल.
- पुढील काळामध्ये इयत्ता १ली ते ५वी, ६वी ते ८वी किंवा ९वी ते १०वीच्या शाळांना नैसर्गिक वाढ राहणार नाही.
दि.०२/०७/२०१६ च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश
खालीलप्रमाणे आहेत :
मुख्याध्यापकांची पदे :
- अ) शाळांमध्ये मान्य झालेल्या मुख्याध्यापकाचे पद शासन निर्णय दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ अन्वये अनुज्ञेय ठरत नसल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमधील मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे. अशा समायोजनानंतर तरीपण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत / पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे. सदर मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती वा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्ये अभावी मुख्याध्यापकाचे पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे.
- ब) तथापि, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची राज्यामध्ये अंमलबजावणी केल्यानंतर सदर अधिनियमातील तरतूदीमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाची पदे अतिरिक्त होतील, सदर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांना उपरोक्त अ लागू राहणार नाही.
उपमुख्याध्यापक /पर्यवेक्षक
पदे :
- दिनांक २८ ऑगस्ट, २०१५ रोजीच्या शासन निर्णयापूर्वी मान्य झालेल्या उपमुख्याध्यापकाचे/ पर्यवेक्षकाचे पद सुधारित निकषांप्रमाणे अतिरिक्त ठरत असल्यास सदर कार्यरत उपमुख्याध्यापक/पर्यवेक्षक यांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी सेवानिवृत्त होईपर्यंत अथवा अन्य कारणांनी ते पद रिक्त होईपर्यंत कायम ठेवावे. सदर उपमुख्याध्यापक / पर्यवेक्षकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषांप्रमाणे पटसंख्ये अभावी पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करावे.
- पर्यवेक्षक पद मंजूर करताना इ.५वी च्या वर्गामूळे मंजूर होणारे शिक्षकांची पदे देखील गृहीत धरण्यात यावीत.
दि.01/01/2018 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश
खालीलप्रमाणे आहेत :
- शासन निर्णय दिनांक २८.०८.२०१५ मधील निकषानुसार विद्यार्थी गटानुसार इ.१ ते इ.५ वी, इ.६वी ते इ.८ वी व इ. ९वी ते इ. १० वी याप्रमाणे शिक्षक पदे मंजूर करण्यात येत आहेत. यामुळे मागील वर्षामध्ये एखाद्या गटातील विद्यार्थी संख्या कमी झाल्यास त्या गटातील निकषानुसार शिक्षक पदे कमी होतात परंतू त्याच शाळेतील अन्य गटात विद्यार्थी संख्या जास्त झाली असल्यास अतिरिक्त पद अनुज्ञेय होत नव्हते. यासाठी शाळेच्या एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत एखादया गटात शिक्षक कमी होत असतील तर त्याच शाळेच्या अन्य गटात विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांचे पद अनुज्ञेय होईल.
- शासन निर्णय दिनांक २८.०८.२०१५ मध्ये इ.९ ते इ.१० वी साठी विद्यार्थी संख्येवर आधारीत किमान ३ शिक्षक अनुज्ञेय आहेत. मात्र संच मान्यता करताना आतापर्यंत माध्यमनिहाय संचमान्यता झालेली नाही, या गटामध्ये विषयनिहाय अध्यापन पध्दत अवलंबविण्यात येत असल्यामुळे माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या विचारात घेऊन संचमान्यता करण्यात यावी.
मा. शिक्षण
आयुक्त कार्यालय महाराष्ट्र शासन यांचे मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व
क्रिडा विभाग, मुंबई यांना लिहीलेले दि.13/07/2020 रोजीचे पत्रानुसार खालील प्रमाणे
पदे प्रस्तावीत करण्यात आलेली आहेत.
सदर लेखासाठी
संदर्भ म्हणुन वापरलेले शासननिर्णय व परीपत्रके आपण खालील लिंक वर क्लिक करुन पाहू
शकता किंवा डाउनलोड देखील करु शकता.
( दि. 28/08/2015 रोजीचा शासननिर्णय )
( दि. 02/07/2016 रोजीचा शासननिर्णय )
( दि. 01/01/2018 रोजीचा शासननिर्णय )
( दि.13/07/2020 रोजीचे मा. शिक्षण आयुक्त यांचे मा. अपर मुख्य सचिव, यांना लिहीलेले पत्र )
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.