यंदा ३१ मे पर्यंत शिक्षकांच्या बदल्या मोबाईल ॲपच्या सहाय्याने ऑनलाईनच होणार
अभ्यास गटाच्या बैठकीत बदल्यांबाबत
एकमत
दोन वर्षांपासून सतत टळत असलेल्या
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यंदा कोणत्याही परिस्थितीत होणारच याबाबत
अभ्यासगटाच्या बैठकीत सर्व शिक्षक संघटनांसह अधिकाऱ्यांचे एकमत झाले. ऑनलाईन
बदल्या शंभर टक्के पारदर्शक होण्यासाठी मोबाइल अॅप विकसित केले जाणार आहे. बदलीचा
अर्ज भरण्यापासून इतर सर्व प्रक्रिया या अॅपद्वारेच पार पाडली जाणार आहे. बदल्या
कशा कराव्या? या प्रक्रियेत कोणत्या सुधारणा कराव्या? याकरिता शासनाने मागील वर्षी पुणे जिल्हा
परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात इतर पाच जिल्हा
परीषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभ्यासगट नेमला होता. या अभ्यास गटाने
विविध राज्यांतील प्रक्रियेचा अभ्यास करून तसेच महाराष्ट्रातील शिक्षक नेत्यांशी
चर्चा करून शासनाला बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्याची शिफारस केली आहे.
मात्र, कोरोनामुळे गेल्या दोन शैक्षणिक सत्रांत
बदली प्रक्रिया रखडली होती.
दरम्यान, यंदा बदल्या करण्यासंदर्भात अभ्यास गटाने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची
ऑनलाईन बैठक घेतली. त्यात बदलीविषयक संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार
यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपूर्वी बदल्यांचे आदेश निर्गमित होतील. पहिल्या
संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर पुढील संवर्गाच्या बदल्या टप्प्याटप्प्याने केल्या
जातील. बदलीची संपुर्ण ऑनलाईन प्रक्रिया प्रत्येक शिक्षकाला मोबाइलवरच हाताळता यावी
याकरीता मोबाइल अॅप विकसित केले जाणार आहे.
शिक्षकांची डोकेदुखी संपणार
बदली प्रक्रिया मोबाइल अॅपवरून होणार
असल्याने हजारो शिक्षकांचा त्रास वाचणार आहे. बदलीसाठी या अॅपवरच अर्ज सोप्या
पद्धतीने भरता येणार आहेत. याशिवाय विविध संवर्गातील शिक्षकांची यादी, अवघड क्षेत्रातील गावांची यादी, रिक्त पदांची यादी या अॅपवरच सर्वांना
पाहता येणार आहे. त्यासंबंधीच्या सॉफ्टवेअरचे काम अंतिम टप्प्यात असून, फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे अॅप रेडी
होईल. तर
मार्चमध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र, मोबाइल अॅपवरील प्रक्रिया आधी कोणत्या
तरी एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवून नंतरच त्याचा वापर राज्यभर केला जावा, अशी सूचना शिक्षक संघटना समन्वय
समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे यांनी केली आहे.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.