प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. सर्व सरकारी कामांसह खासगी कामांसाठीही आधार नंबरची गरज असते.
UIDAI कडून आता PVC Aadhaar Card ही दिलं जातं. पीव्हीसी आधार कार्ड पाहताना ATM प्रमाणे दिसतं आणि ते फाटण्याचंही किंवा पावसाने अथवा पाण्याने भिजण्याचे देखील टेन्शन नसतं.
कसं बनवता येईल PVC Card ?
- PVC Card साठी UIDAI च्या www.uidai.gov.in या वेबसाइटवर जा.
UIDAI च्या वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- इथे 'My Aadhaar' सेक्शनमध्ये 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा.
- त्यानंतर आधारचा 12 अंकी किंवा 16 अंकी व्हर्चुअल आयडी किंवा 28 अंकी आधार एनरोलमेंट ID टाका.
- आता सिक्योरिटी कोड किंवा कॅप्चा भरा
आणि OTP साठी Send OTP वर क्लिक करा.
- रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.
- इथे पीव्हीसी आधार कार्डचा एक
प्रीव्ह्यू दिसेल.
- त्यानंतर Payment पर्यायावर क्लिक करा.
- पेमेंट पेजवर 50 रुपये फी जमा करावी लागेल.
- पेमेंट पूर्ण केल्यानंतर PVC Aadhaar Card साठीची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल.
सदर ऑर्डर केलेले आधार कार्ड आपल्या आधार डेटाबेस
मध्ये नोंदवलेल्या पत्त्यावर speed post ने UIDAI व्दारे
पाठवण्यात येते.
आपणास हे देखील उपयोगी पडेल.
👇👇👇👇👇👇👇👇👇
नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड मोफत डाऊनलोड कसे करावे?
तुमच्या परवानगीविना कोणी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर करत नाही ना? असं तपासा
आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अपडेटेड माहिती मिळवा.
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.