How to change mobile Number Registered on Cowin Portal | लसीकरणासाठी नोंदणी केलेला मोबाईल नंबर कसा बदलावा?

मित्रांनो जर आपण कोवीड लसीकरणासाठी नोदंणी करतांना Register केलेला मोबाईल क्रमांक काही कारणास्तव बदलु इच्छीत असाल तर ते आता शक्य आहे.  त्याचप्रमाणे लसीकरण प्रमाणपत्रावरील तुमचे नाव/वय/लिंग/ओळखीचा पुरावा क्रमांक चुकीचे लिहिले गेले आहे तर त्यामध्येही बदल करणे शक्य आहे. आपण ते कसे बदलु शकता याबाबत माहीती खाली दिलेली आहे.


मोबाईल नंबर बदलण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर Cowin.gov.in  ही वेबसाईट उघडा
  • Cowin.gov.in  वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला Register/ Sign In हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.
  • येथे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करताना वापरलेला क्रमांक (रजिस्टर्ड मोबाईल नंबर) टाका व Send OTP हा पर्याय निवडा.
  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोविन पोर्टलवरील खात्यात (अकाउंट) प्रवेश मिळेल.
  • ‘Raise an issue' या टॅबवर क्लिक करा. आपणास खालील प्रमाणे स्क्रिन दिसेल.


  • 'Transfer a member to new mobile number' हा ऑप्शन निवडा.
  • ‘Member Details ' अंतर्गत आपण हस्तांतरित करू इच्छित असलेले नाव निवडा.
  • ' Transfer Member' या पर्याया अंतर्गत Transfer To च्या समोर Enter new mobile number  मध्ये ज्या मोबाईल नंबर ला तुम्हाला लाभार्थी ट्रान्सफर करायचा आहे तो नवीन मोबाईल नंबर टाका.
  • ‘I understand that the selected member will be removed from my account in the transfer process and that this process is irreversible. च्या अगोदर असणा-या चौकोनात क्लिक करा.
  • ‘Continue’ या बटनावर क्लिक करा.
  • तुम्हाला एक OTP मिळेल. पूर्ण करण्यासाठी तो प्रविष्ट करा.
  • कृपया लक्षात घ्या की नंबर एकदाच बदलला जाऊ शकतो.

कोविन वेबसाईटवर जाऊन सर्टिफिकेटवर दुरुस्ती कशी करायची

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर Cowin. gov.in  ही वेबसाईट उघडा
  • Cowin.gov.in  वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला रजिस्टर/ साइन इन हा पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.
  • येथे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करताना वापरलेला क्रमांक (रजिस्टर्ड मोबाईल नंबर) टाका व सेंड ओटीपी हा पर्याय निवडा.
  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कोविन पोर्टलवरील खात्यात (अकाउंट) प्रवेश मिळेल. तुमच्या अकाउंट डिटेल्स खालोखाल raise an issue (रेज ऍन इश्यू) पर्याय दिसेल. हा पर्याय निवडा.
  • हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यापुढे What is the issue? असा प्रश्न येईल. तेथे Correction in certificate हा पर्याय निवडा.
  • कोविन पोर्टलवर देण्यात आलेल्या या सुविधेद्वारे तुम्ही तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रावरील (सर्टिफिकेट) नावजन्मवर्ष व लिंग यांमधील कोणत्याही दोन गोष्टींमध्ये बदल करू शकता. या सुविधेचा लाभ केवळ एकदाच घेता येतो.
  • तुम्हाला सर्टिफिकेटवरील जी माहिती बदलायची आहेत्यापुढे क्लिक करा. यानंतर Continue हा पर्याय निवडून पुढे जा.
  • तुमच्यापुढे बदल करावयाची माहिती येईल. जी माहिती अद्ययावत करायची आहे ती माहिती भरा.

अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रात (व्हॅक्सिन सर्टिफिकेट) घरबसल्या दुरुस्ती करू शकता.

Post a Comment

0 Comments