Good News! आता WhatsApp वरुन देखील लसीकरणासाठी नोंदणी करा.| Book covid19 vaccination slot on WhatsApp.

 

केंद्र सरकारने WhatsApp वर आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याआधी लोकांना कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट WhatsApp वरुन मिळवता येत होते. पण, आता नागरिकांना WhatsApp वर लसीकरणासाठी नोंदणीही करता येणार आहे. नागरिक MyGov च्या WhatsApp क्रमांकावर मेसेज पाठवून लसीकरणासाठी नोंदणी करु शकणार आहेत. अनेक भारतीय आता मोबाईलवर WhatsApp चा वापर करत आहेत. शिवाय WhatsApp वरुन लस घेण्यासाठी नोंदणी करणे अधिक सोपं जाणार आहे.

CoWin चा वापर करुन लोक सध्या लसीकरणासाठी नोंदणी करतात. पण, आता WhatsApp वरुनही त्यांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे.

(WhatsApp च्या माध्यमातून डाउनलोड करा तुमचे लसीकरण सर्टिफिकेट Download Covid Vaccine Certificate By WhatsApp)

नव्या फिचरबाबत बोलताना MyGov सीईओ अभिषेक सिंह म्हणाले की, 'MyGov Corona Helpdesk च्या माध्यमातून लाखो लोकांना फायदा झाला आहे. एक चांगले व्यासपीठ आणि तंत्रज्ञान एकत्र आले तर चांगले निकाल दिसून येतात. WhatsApp ने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. कोरोना महामारीच्या काळात WhatsApp ने एक चांगले चॅटबोट उपलब्ध करुन दिले आहे.' माहितीनुसार, MyGov chatbot चा वापर करुन आतापर्यंत 32 लाख लोकांनी कोविड सर्टिफिकेट डाऊनलोड केले आहे.

WhatsApp वरुन लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

- तुमच्या कॉन्टॅक्ट यादीत MyGov corona helpdesk क्रमांक 9013151515 सेव करा.

- क्रमांक सेव्ह केल्यानंतर यावर तुम्ही "Book Slot" असा मेसेज पाठवा

- तुम्हाला SMS द्वारे सहा अंकी OTP क्रमांक पाठवला जाईल. तो क्रमांक याठिकाणी चॅटमध्ये टाका.

- तुमच्या मोबाईल क्रमांकावर नोंद असलेल्या सदस्यांची यादी तुम्हाला दिसेल

- तुम्ही 1,2,3 पर्यायांपैकी एक निवडू शकता

-चॅटमध्ये तुम्ही पीन कोड टाका, त्यानंतर WhatsApp तुम्हाला परिसरातील लसीकरण केंद्राची यादी दाखवेल.

- तुमची अपॉईंटमेंट निश्चित करा आणि दिलेल्या तारखेला लसीकरण केंद्राला भेट द्या.

Post a Comment

0 Comments