मतदारांना इ ओळखपत्र डाउनलोड करता येणार.. Download e Epic

२५ सप्टेंबर २०२० ते १५ जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या मतदारांनी इ-मतदार ओळखपत्र (e-EPIC) डाऊनलोड करावे, त्यासाठी १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२१ पूर्वी आणि त्यानंतर मतदार नोंदणी करताना मोबाईल क्रमांक नोंदविलेले मतदार इ-मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यास पात्र आहेत. मतदारांनी मोबाईल क्रमांक नोंदविलेली यादी सी-डॅक संस्था उपलब्ध करणार आहे.

इ-मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी एकाच तासाचा कालावधी असून, त्याबाबत दक्षता घ्यावी असे आयोगाचे निर्देश आहेत.

इ-मतदार ओळखपत्राचे नागरिकांना फायदे

डिजिटल स्वरुपात निवडणूक छायाचित्र ओळखपत्र मिळवण्याचा पर्यायी आणि वेगवान प्रकार

मतदार ओळखीसाठी दस्तऐवजाचा पुरावा म्हणून वैध

मतदाराच्या सोयीनुसार छापणे शक्य

मतदानादरम्यान पुरावा म्हणून वापरणे शक्य

ओळखपत्र कसे डाउनलोड करावे?



Post a Comment

0 Comments