Facebook वर तुमचंही Fake Account ओपन झालं असेल तर लगेच असं करा डिलीट.

फेसबुकवर अनेकांचे प्रोफाईल हॅक (Hacking) करुनयुजरच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडे पैसे मागण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच सायबर पोलिसांकडे फेसबुक प्रोफाईल हॅक झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. डॉक्टरपोलीसवकील यांची बनावट प्रोफाईल तयार करुन त्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे कोणीहीफेसबुक किंवा कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवरुन पैशांची मागणी केल्याससावध व्हा. ज्याच्या नावाने पैसे मागितले गेलेत्याला प्रत्यक्ष फोन करुन माहिती करुन घ्याअसं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे. कोणालाही तुमची पर्सनल माहिती देऊ नकाअसंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.


फेसबुकवर हॅकर्सकडून अनेकांची फेकबनावट अकाउंट ओपन केली जात आहेत. अशात 

(तुमचे फेसबुक अकाउंट असे करा सुरक्षीत. कधीच होणार नाही हॅक)

जर तुमचंही फेक अकाउंट तयार झाल्याचं समजल्यास या स्टेप्स फॉलो करा आणि फेक अकाउंटबद्दल तक्रार करा.

तुमचं फेसबुकचं फेक अकाउंट बनल्याचं (Facebook Fake Account) समजल्यासतुमच्या स्वत:च्या अकाउंटवर ते फेक प्रोफाईल शोधा किंवा तुमच्या मित्रांना त्या फेक अकाउंटची लिंक पाठवण्यास सांगा.

त्यानंतर फेक अकाउंटच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

- Find support or report profile यावर क्लिक करा.

- pretending to be someone या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तीन पर्याय दिसतील. me, a friend, celebrity असे पर्याय दिसतील.

तुमचं प्रोफाईल फेक असल्यास, Me वर क्लिक करा.

काही वेळातच तुमचं फेक अकाउंट बंद होईल. त्यानंतर तुमच्या खऱ्या प्रोफाईलवर फेक अकाउंटबाबत माहिती द्या.

तुमची फ्रेंडलिस्ट स्वत:साठीच ओपन ठेवा. तुमचे फ्रेंड्स इतरांना दिसू नये यासाठी who can see your friend list मध्ये only me हा पर्याय निवडा.

फोटोव्हिडीओ डाउनलोड न होण्यासाठी lock your profile वर क्लिक करा.

अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासाठीचा पर्याय बंद करा. केवळ friends of friends हा पर्याय ठेवा.

तसंच फेसबुक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी two-factor authentication ऑन ठेवा.

तुमचा फोन नंबरईमेल आयडी इतरांना दिसू नयेयासाठी only me पर्याय निवडा.

 

Post a Comment

0 Comments