कोरोना लसीच्या नोंदणी प्रक्रियेत Co-win पोर्टल वरील तुमची एक चूकदेखील
तुम्हाला महागात पडू शकते. कोरोना लस घेण्यासाठी भारत सरकारच्या co-win पोर्टलवर नोंदणी करावी लागते. पण आता
नोंदणीबाबत सरकारने नवीन नियम केला आहे. या पोर्टलवर नोंदणी प्रक्रियेत तुम्ही एक
छोटीशी चूक केल्यामुळे तुम्हाला कोवीन पोर्टलवर ब्लॉक केलं जाऊ शकतं.
कोरोना लसीसाठी काही लोक स्लॉटसाठी वारंवार प्रयत्न
करत आहेत, ब-याच
वेळा ओटीपी देखील मागवत आहेत. स्लॉटसाठी 24 तासांत एक हजार पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करणाऱ्या
लोकांना आणि 24
तासांत पन्नास पेक्षा जास्त ओटीपी जनरेट करणाऱ्या वापरकर्त्यास cowin पोर्टल यानंतर ब्लॉक करणार आहे.
या पोर्टलवरून सदर वापरकर्त्यास केवळ एक दिवसासाठी
म्हणजेच 24
तासांसाठीच ब्लॉक केलं जाईल. याशिवाय cowin पोर्टलवर 15 मिनिटांत 20 पेक्षा जास्त वेळा सर्च रिक्वेस्ट पाठवल्यास कोवीन सिस्टम वापरकर्त्यास लॉग आउट करेल
हा उपाय को-विन पोर्टलवर ऑटोमेट स्लॉट
बुकिंगसाठी बॉट्स तसंच स्क्रिप्ट रोखण्यासाठीचा प्रयत्न आहे. बुकिंग स्लॉटला
मॅन्युअलपणे करणाऱ्या लोकांना बॉट्ससोबत स्पर्धा करावी लागू नये म्हणुन हे सगळं
करण्यात येत आहे.
पोर्टलवर उपलब्ध स्लॉटसाठी पब्लिक सर्च एक ऑप्शन आहे. जिथं युझर्स
लॉगइन न करताही स्लॉट शोधु शकतात. याशिवाय खूप कमी वेळात स्लॉटसाठी जास्त
रिक्वेस्ट करणारे युझर्स बॉट अॅक्टिव्हिटीचा संशय वाढवतात. एकापेक्षा जास्त अॅप्सवरून
लसीसाठी स्लॉट बुक करण्याची सोय असल्यामुळे लोकांना लसीचे स्लॉट शोधणं सोपं जातं.
काही दिवसापुर्वी केंद्र सरकारने cowin पोर्टलसाठी काही नवीन गाइडलाइन्स जारी
केल्या आहेत. त्या थर्ड पार्टीला आपल्या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन, शेड्यूलिंग आणि व्हॅक्सिनेशन मॅनेजमेंट
एनेबल करण्याची परवानगी देतात. यापूर्वी डेव्हलपर्स फक्त उपलब्ध असलेल्या
स्लॉटबद्दलची माहिती आणि अॅपच्या माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा देऊ शकत होते. याआधी सरकारच्या आरोग्य सेतू आणि उमंग
या दोन App च्या
माध्यमातून युझर्स cowin शिवाय रजिस्ट्रेशन आणि कोविड-19 व्हॅक्सिन अपॉइंटमेंट बुक करू शकत
होते.
Cowin app वर कसे कराल रजिस्ट्रेशन?
तुम्हालाही लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करायचं
असेल तुम्ही तीन पद्धतीने ते करु शकता. यात सेल्फ रजिस्ट्रेशन, ऑन-साईट रजिस्ट्रेशन आणि फॅसिलेटेड
कोहोर्ट रजिस्ट्रेशन प्रोसेस यांचा समावेश होतो. सेल्फ रजिस्ट्रेशनसाठी
तुम्हाला cowin 2.0 app डाऊनलोड करावा लागेल. याशिवाय तुम्ही arogya
setu आणि co-win
website (cowin.Gov.In) वरुनही
रेजिस्ट्रेशन करु शकता. Co-win
app वर कशाप्रकारे
रेजिस्ट्रेशन करायचं याबाबत जाणुन घेऊया.
- - Playstore वरुन तुम्हाला सर्वात आधी cowin app डाऊनलोड करावा लागेल
- - त्या ॲप वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक टाकुन ओटीपी जनरेट करावा लागेल व तो otp टाकून व्हेरिफाय करा
- - यानंतर तुम्हाला लसीकरण पेज दिसेल. यावर तुम्हाला फोटो आयडी प्रूफचा ऑप्शन निवडावा लागेल.
- -त्यानंतर तुम्हाला नाव, वय, लिंग इत्यादी माहीती भरावी लागेल.
- - संपूर्ण माहीती भरुन झाल्यानंतर तुम्ही Register बटनावर क्लिक करु शकता.
- - तुम्ही एकाच मोबाईल क्रमांकावरुन आणखी तीन लोकांचे Registration करु शकता.
- -यानंतर तुम्ही shedule appointment ऑप्शन निवडा.
- - पुढील स्क्रीनवर तुम्ही राज्य, जिल्हा किंवा पिनकोड टाकून लसीकरण सेंटर निवडू शकता.
- - तुमच्यासमोर लसीकरणासाठी उपलब्ध असलेली तारिख आणि स्लॉट दिसेल.
- - यानंतर दिसणा-या स्लॉट वर क्लिक करुन तुम्हाला स्लॉट बुक करावं लागेल.
- - यानंतर तुम्हाला लसीकरण सेंटरच्या डिटेलचा मेसेज मिळेल.
- - काही कारणामुळे आपण निश्चित केलेल्या वेळेवर लस घेउ शकला नाहीत तर तुम्ही याला रीशेड्यूल करु शकता.
जर तुम्हाला co-win app डाऊनलोड करायचं नसेल तर cowin.Gov.In
या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही रजिस्ट्रेशन
करु शकता. वेबसाईटवर देखील तुम्हाला हीच प्रोसेस फॉलो करावी लागेल.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.