कंत्राटी शिक्षक भरती चा शासन निर्णय अखेर रद्द, १० पेक्षा कमी पटांच्या शाळांना देखील मिळणार नियमित शिक्षक
आपल्यासाठी महत्त्वाचे
महाराष्ट्र शासनाने दिनांक 23/09/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड/ बी.एड. आर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यास मान्यता दिली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत अशा स्वरूपाची तात्पुरती व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली होती. सन 2022 मधील TAIT चाचणीतील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे आर्हताधारक व नियमित शिक्षक उपलब्ध होणार आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन शासनाने वरील शासन निर्णय अधिक्रमित केला आहे. त्यामुळे कंत्राटी तत्त्वावरील नियुक्ती मिळालेल्या बेरोजगार उमेदवारांना यापुढे नियुक्ती देता येणार नाही अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.