SMC Meeting शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन विकास समिती मासिक बैठक (माहे जुलै २०२३) ऑफलाईन आयोजित करणेबाबत


माहे जुलै २०२३ शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन विकास समिती बैठक खाली दिलेल्या विषयानुसार माहे जुलै २०२३ च्या चौथ्या / पाचव्या आठवड्यात आयोजित करण्यात यावी. बैठकीचे आयोजन हे ऑफलाईन स्वरुपात करावे. बैठक संपल्यानंतर मासिक बैठकीचा अहवाल व इतिवृत्त फोटोसह विनोबा APP वर अपलोड करावे. शाळा समिती बैठक झाल्यानंतर लिंक त्याच दिवशी भरणे आवश्यक आहे. क्षेत्रीय अधिकारी व विषय साधन / विशेष साधन व्यक्ती / विशेष शिक्षक यांनी शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन विकास समितीच्या बैठकीत सहभाग घ्यावा. या महिन्यातील बैठक यापूर्वी शाळेत घेण्यात आली असेल तर वरील लिंक वर जाऊन विनोबा App मध्ये माहिती भरावी. 

शाळा व्यवस्थापन समिती / शाळा व्यवस्थापन विकास समितीच्या बैठकीचे विषय पुढीलप्रमाणे राहतील.


१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.


२) वर्गवार विद्यार्थी पटनोंदणी व उपस्थितीचा आढावा घेणे. 


३) वर्गनिहाय गैरहजर मुलांचा आढावा घेणे व उपाययोजना करणे


४) विद्याप्रवेश कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी व चर्चा करणे.


५) शाळाबाह्य सर्वेक्षण - (मिशन झिरो ड्रॉप आऊट) - शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्याबाबत बैठकीत चर्चा करणे.


६) शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करणे.


७) निपुण भारत अभियान अंमलबजावणी बाबत SMC सदस्यांना अवगत करणे. केंद्रस्तर शिक्षण परिषद मध्ये १००% शिक्षकांचा सहभाग होता का याचा आढावा घेणे.


८) शैक्षणिक उठाव / शाळा सुधार योजना उद्दिष्ट ठरविणे व नियोजन करणे.


९) सेतू अभ्यासक्रम उपक्रमामधील विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा शाळा व्यवस्थापन समिती यांना अवगत करणे. (१०) दिव्यांग विद्यार्थीसाठी आवश्यक उपाययोजना संदर्भात विशेष साधन व्यक्ती व विशेष शिक्षक यांच्याशी चर्चा करणे.


११) निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम (२.०) अंमलबजावणी बाबत चर्चा करणे. 


(१२) विनोबा App वर शैक्षणिक कामकाजाचे Video अपलोड करणे.


१३) अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणारे विषय.


पुढील मासिक आढावा बैठकीबाबत च्या सूचना विनोबा App वर दिल्या जातील.


टीप- ज्या मुख्याध्यापकांना विनोबा App संदर्भात काही तांत्रिक समस्या असेल त्यांनी येथे क्लिक करा.

परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments