महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या संदर्भातील पोर्टल सध्या सुरू असून संवर्ग 1, संवर्ग 2 व संवर्ग 3 ची बदली प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे. सध्या संवर्ग 4 मधील शिक्षकांसाठी बदली फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र संवर्ग चार मधील बदली पात्र शिक्षकांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. यावर्षीच्या बदली प्रक्रियेत सीनियर - ज्युनिअर असा कुठलाही भेद न ठेवता कोणत्याही बदली पात्र शिक्षकास दुसऱ्या बदली पात्र शिक्षकाची जागा मागता येते त्यामुळे कोण शिक्षक कोणत्या गावाची मागणी करणार यासंदर्भात अंदाज बांधता येत नाही. खालील व्हिडिओ नुसार आपण कृती केल्यास इतर शिक्षकांनी कोणत्या संवर्गातून फॉर्म भरला आहे? त्याचबरोबर त्यांनी एकक युनिटचा लाभ घेतला आहे किंवा नाही? कोणत्या गावांचा प्राधान्यक्रम कोणत्या क्रमाने भरला आहे? याबाबतची माहिती पाहता येते. त्यावरून आपणास आपला फॉर्म भरताना अंदाज बांधता येतो.
इतर शिक्षकांनी भरलेला फॉर्म पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
१) http://ott.mahardd.com या बदली पोर्टलवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
२) वरील डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन रेषांवर क्लिक करून मेनू ओपन करा.
३) त्यामधील Intra District हा टॅब निवडा.
४) त्यानंतर Lists या ऑप्शन वर क्लिक करा.
५) आपणांसमोर District , Taluka , School / Name इत्यादी माहिती भरून सर्च करा.
६) सदर व्यक्तीने फॉर्म भरलेला असल्यास आपणास खाली हिरव्या पट्टीत त्यांनी निवडलेले preferences क्रमाने दिसतील.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.