वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी वाढविणेबाबत | Teacher Training

 

महाराष्ट्र शासनशालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र

विषय:- ऑनलाईन पोर्टलवरील वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी वाढविणेबाबत....

संदर्भ :-

१) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२१-२२/३८७१, दि.२२/११/२०२१

२) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. राशसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण (SBTE) / २०२१-२२/४०२०, दि. ३/१२/२०२१

३) प्रस्तुत प्रकरणी विविध संघटनांची प्राप्त पत्रे दि.२४/११/२०२१, दि.१/१२/२०२१, दि.६/१२/२०२१ इत्यादी

उपरोक्त विषयान्वये संदर्भीय पत्र क्र. १ व २ अन्वये वरिष्ठ निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांना नाव नोंदणी करणेसाठी पोर्टल विकसित करण्यात आलेले असून नोंदणी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये पोर्टलवरील ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी दि.०५/०१/२०२२ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन, वेळापत्रक व सूचना खालीलप्रमाणे आहेत 

१.      पोर्टलवरील ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी - दि. ०५/०१/२०२२

२.  नोंदणी केलेल्या तथापि पेमेंट पूर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांनी पेमेंट पूर्ण करणे - दि.०६/०१/२०२२ ते दि.०८/०१/२०२२

३.  शालार्थ आयडी नसलेल्यांनी लिंकमध्ये (लिंक क्र. २) नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीची माहितीची जिल्हास्तरावर पडताळणी करणे - दि.९/०१/२०२२ ते दि. १५/०१/२०२२

४.     नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लॉगीन आयडी व पासवर्ड पाठविणे - दि. १६/०१/२०२२ ते  दि.२०/०१/२०२२

   अधिक माहीतीसाठी खालील पोस्ट वाचा

   वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे.

Post a Comment

0 Comments