महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
विषय:- दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या ऑनलाईन गुगल
क्लासरूम प्रशिक्षणाबाबत.
संदर्भ -
१. शासन पत्र
संकीर्ण-२०२०/प्र.क्र.८७ / एसडी-६ दिनांक जून २०२०. |
२. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.
राशैसंप्रप / गुगल क्लासरूम / २०२०-२०२१ दिनांक ११ जुलै २०२०. |
३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र.
राशैसंप्रपम/आय.टी./गुगल क्लासरूम नोंदणी/ २०२१/३१४०
दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१. |
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण
झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी
शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला. यानुसार
संदर्भ क्रमांक २ अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये
गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी
भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल
टूल्सचा प्रभावी व यशस्वी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य
अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व
विद्यार्थ्याना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी
पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त
विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Leadership for Teaching and
Learning in the Classroom" या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाईन वेबिनारचे
आयोजन दिनांक २३ व २४ डिसेंबर, २०२१ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या वेबिनारमध्ये अध्यापनासाठी
उपयुक्त अशा गुगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले
जाणार आहे.
सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या युट्युब लिंक्स खालीलप्रमाणे आहेत.
शेवटच्या कॉलम मध्ये दिलेल्या बटनावर क्लिक करुन आपण प्रशिक्षणात जॉईन होऊ शकता.
अ.क्र. |
प्रशिक्षण
दिनांक |
प्रशिक्षण
लिंक |
प्रशिक्षण वेळ |
जॉईन लिंक |
१. |
२३ डिसेंबर, २०२१ |
https://youtu.be/qzCACIYQDvQ |
दुपारी ३:००
ते ५:०० |
|
२. |
२४ डिसेंबर, २०२१ |
https://youtu.be/BfkYHZ4A1il |
दुपारी ३:००
ते ५:०० |
२३ डिसेंबर, २०२१ रोजीचे प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
२४ डिसेंबर, २०२१ रोजीचे प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
यानुसार दोन दिवसीय गुगल क्लासरूम
प्रशिक्षणासाठी संदर्भ क्रमांक ३ अन्वये राज्यातील एकूण ८०,०६९ शिक्षकांनी आपली नावनोंदणी केलेली
आहे. सदरच्या नोंदणी केलेल्या शिक्षकांना G suit आय.डी. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत SMS द्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
“ Dear Teachers, Thank you for
registering for the teacher training webinar designed by the
SCERT,Maharashtra,Pune in collaboration with Google for Education. We hereby
request you to attend 2 days webinar and complete the post-assessment.
Join the session on 23rd and 24th
December 2021
at 3.00
pm using your login id xxxx84.xxxxxx@mahaeschool.ac.in
and password xxxxxxxx. Team Schoolnet ”
तरी प्रशिक्षणादरम्यान व नंतर च्या
कालावधीमध्ये आवश्यक प्रात्यक्षिक कामकाज प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या G suit आय. डी. चा वापर करून करावे. सदरचा G suit आय. डी. व पासवर्ड संबंधित
प्रशिक्षणार्थी याने जतन करून ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच प्रशिक्षण
सत्रांच्या व उत्तर चाचणी पूर्ततेनंतर आपणास प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण
प्रमाणपत्र प्राप्त होईल याची नोंद घ्यावी.
1 Comments
Nice patil
ReplyDeleteThanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.