दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.
मागील वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला आवेदन केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाकडून दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. तसा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.
परीक्षा शुल्क परताव्यासाठी
विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाने दिलेल्या वेबसाईटवर नोंदवण्याच्या सूचना परिपत्रक
काढून राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा
झाली नसल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे.
बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल
करण्याच्या तारखा जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालामार्फत त्यांना दिलेल्या लॉगीन मधुन www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
नियमित विद्यार्थ्यांनी आजपासून 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत.
मात्र पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. 03/12/2021 ते 11/12/2021 पर्यंत घेण्यात येणार आहेत.
त्यांनतर दि.13/12/2021 ते 20/12/2021 पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना अर्ज सादर करावयाचा असल्यास विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.