कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी काही विद्यार्थी ऑनलाइन तर काही विद्यार्थी ऑफलाइन अशा प्रकारे ‘हायब्रिड मॉडेल’चा विचार व्हावा अशी सूचना राज्य बालरोग टास्क फोर्सचे प्रमुख आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. बकुल पारेख यांनी केली आहे.
शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि मानसिकतेचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे. शाळा सुरु करण्यासाठी काही सुचना या टास्क फोर्स ने केल्या आहेत त्यामध्ये
- स्कूल बसमध्ये मर्यादित विद्यार्थी बसवणे
- वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवणे
- विद्यार्थी एकत्र येतील असे सांघिक खेळ वा कृती टाळणे.
- शाळा वेगवेगळ्या सत्रांमध्ये भरवणे.
- काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन सत्रात, तर काही विद्यार्थ्यांना ऑफलाइन सत्रात सहभागी करून घेणे.
अशा पद्धतीने ‘हायब्रिड मॉडेल’चा अवलंब करून शाळा सुरू करता येईल, असे मत डॉ. पारेख यांनी मांडले.
टास्क फोर्स ने दिलेल्या सुचनांचा स्विकार करुन त्यावर अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारच्या हाती आहे. त्यामुळे आता यावर लगेच निर्णय होऊन शाळा सुरु होतात का? हे पहावे लागेल.
अनेक लहान मुलांना कोविडची बाधा होऊनदेखील सौम्य लक्षणामुळे समजले नाही. तसेच लहान
मुलांमध्ये गंभीर स्वरूपाचा कोविड होण्याची शक्यता फार कमी आहे; तरीही शाळा सुरू करताना प्रशासनाने
योग्य काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉ. दलवाई म्हणाले. राज्य सरकारकडूनही संभाव्य
तिसऱ्या लाटेची पूर्व तयारी केली जात आहे.
लहान मुलांमध्ये लस घेतल्यानंतर लगेच
प्रतिकारशक्ती तयार होत नाही. लसीकरण ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. त्यामुळे
लसीकरण आणि शाळा सुरू होणे हे दोन पूर्णपणे वेगळे मुद्दे आहेत. - डॉ. समीर दलवाई, बालरोगतज्ज्ञ
1 Comments
Thank u sir
ReplyDeleteThanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.