समाज कल्याण शिष्यवृत्ती योजना. समाज कल्याण विभागामार्फत शालेय शिक्षण घेणा-या इयत्ता 1 ते 12 मधील विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती योजना.


महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांकरीता अनेक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. सदरच्या शिष्यवृत्ती योजना कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहेत?, शिष्यवृत्तीचा दर काय आहे?, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याबाबत माहीती खाली दिलेली आहे. 



सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

  • ·        योजना कोणासाठी

इयत्ता ५ ते १० च्या (SC, VJNT,SBC,OB C) मुलींकरीता फक्त

  • ·        शिष्यवृत्ती दर

५ ते ७ करीता ६००/

८ ते १० करीता १०००/

  • ·        आवश्यक कागदपत्रे

विद्यार्थीनी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

विद्यार्थी पासबुक झेरॉक्स


गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

  • ·        योजना कोणासाठी

इयत्ता ५ ते १० च्या (SC, VJNT,SBC,) मुले व मुलीं करीता

  • ·        शिष्यवृत्ती दर

    SC- ५ ते ७ करीता ५००/- व ८ ते १० करीता १०००/

    VJNT,SBC- ते ७ करीता २००/- व ८ ते १० करीता ७५०/

  • ·        आवश्यक कागदपत्रे

    विद्यार्थी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

    विद्यार्थी पासबुक झेरॉक्स व गुणपत्रक


अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना

  • ·        योजना कोणासाठी

    इयत्ता १ ते १० च्या मुला/ मुलीं करीता

  • ·        शिष्यवृत्ती दर

    शाळेतील नियमित विद्यार्थ्याकरीता ३०००/-

    वस्तीगृहात राहणा-या विद्यार्थ्याकरीता ८०००/

  • ·        आवश्यक कागदपत्रे

    विद्यार्थी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

    विद्यार्थी पासबुक झेरॉक्स,

    आधारकार्ड झेरॉक्स,

    जात प्रमाणपत्र झेरॉक्स,

    रु. 20 /- चा कोर्ट फी स्टँप,

   ग्रा.प.स्तरावरील सरपंच व सचिव यांचे व्यवसाय प्रमाणपत्र व 

   न.प. क्षेत्राकरीता मा.मुख्याधिकारी न.प. यांचे व्यवसाय प्रमाणपत्र


भारत सरकार मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती योजना

  • ·        योजना कोणासाठी

    VJNT, OBC मधील इयत्ता १ ते १० व 

    SC मधील इयत्ता ९ वी १० वी च्या मुला/ मुलीं करीता

  • ·        शिष्यवृत्ती दर

    SC  नियमित करीता 2250/- रु. व वस्‍तीगृहात राहणा-यांसाठी 4500/-रु.

    OBC  नियमित करीता 1500/- रु. वस्तीगृहात राहणा-यांसाठी 5000/-रु.

    VJNT  १ ते ८ करीता 1000/- रु. व इयत्ता ९ व १० करीता 1500/- रु.

  • ·        आवश्यक कागदपत्रे

    विद्यार्थी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

    विद्यार्थी पासबुक झेरॉक्स,

    जात प्रमाणपत्र झेरॉक्स,

    पालकाचा उत्पन्नाचा दाखला रु.२.५ लाख पर्यंतचा

 

परीक्षा फि/ शिक्षण फि

  • ·        योजना कोणासाठी

    इयत्ता १० व १२ करीता SC, ST, VJNT,SBC मधील मुले व मुलीं करीता

  • ·        शिष्यवृत्ती दर

    सर्व विद्यार्थ्याकरीता रु. 385 /-

  • ·        आवश्यक कागदपत्रे

    विद्यार्थी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

    विद्यार्थी पासबुक व आधारकार्ड झेरॉक्स


शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना.

  • ·        योजना कोणासाठी

इ.1 ली ते 10 वी मधील अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, अस्थिवंग,

मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरूग्ण अपंग विदयार्थी.

अपंग विद्यार्थ्यांचे अपंगत्व किमान 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असावे.

  • ·        शिष्यवृत्ती दर
        1 ली ते 4 थी - रु. 100/- दरमहा
        5 वी ते 7 वी - रु. 150/- दरमहा
        वी ते 10 वी - रु. 200/- दरमहा

 मतिमंद - रु. 150 दरमहा

अपंग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी - रु. 300/- दरमहा

  • ·        आवश्यक कागदपत्रे

    विद्यार्थी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

    विद्यार्थी पासबुक व आधारकार्ड झेरॉक्स,

    विद्यार्थ्याचे अपंगत्व प्रमाणपत्र


सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व शिष्यवृत्ती योजना.

  • ·            योजना कोणासाठी

इ.1 ली ते 10 वी मधील अनुसुचीत जमातीचे विद्यार्थी

  • ·        शिष्यवृत्ती दर

1ली ते 4 थी - रु. 1000/-

5 वी ते 7 वी - रु. 1500/-

8 वी ते 10 वी - रु. 2000/-

  • ·        आवश्यक कागदपत्रे

    विद्यार्थी यादी (हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी),

    विद्यार्थी पासबुक व आधारकार्ड झेरॉक्स,

    विद्यार्थ्याचे जात प्रमाणपत्र

(महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभागाचे दि.17 एप्रील 2018 चे शासननिर्णयानुसार सदरची योजना ग्रामविकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे.)

वरील सर्व योजनांचे प्रस्ताव सादर करतांना प्रस्तावावर कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

(सदर माहीती ही विद्यार्थी,पालक व शिक्षक यांचे माहीतीसाठी दिलेली असुन वेळोवेळी योजनेतील होणारे बदल व शासननिर्णयामुळे यामध्ये फरक पडु शकतो.)

Post a Comment

2 Comments

Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.