इयत्ता दहावीचा निकाल उदया ऑनलाईन जाहीर होणार. येथे निकाल पाहून प्रिंट सुध्दा घेता येईल.

 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर

शुक्रवार, दिनांक १६/०७/२०२१ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

निकाल पाहण्यासाठी व प्रिंट करण्यासाठी येथे क्लीक करा

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे.

http:// result.mh -ssc.ac.in

तसेच

www. mahahsscboard.in 

या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार इ. ९ वीचा अंतिम निकाल, इ.१० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.१० वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

दि. २८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील.

निकाल पाहण्यासाठी व प्रिंट करण्यासाठी येथे क्लीक करा


Post a Comment

2 Comments

Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.