सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा
सातबारा काढू शकता आणि तो सरकारी कामकाजासाठी वापरताही येतो.
डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची माहिती आपण या लेखात पाहणार
आहोत.
डिजिटल सातबारा काढण्यासाठी काय करावे?
- सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulekh.Mahabhumi.Gov.In असं सर्च करावं लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.
- या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला digitally signed 7/12 किंवा 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा' हा पर्याय दिसेल. यावर तुम्ही क्लिक केल्यास 'आपला 7/12' नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल, तर लॉग-इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता.
- पण, जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी इथं आला असेल, तर मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढता येईल.
- त्यासाठी otp based login या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर enter mobile Number च्या खालच्या रकान्यात तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि मग send otp या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की, otp sent in your cellular असा मेसेज तिथं येईल.
- याचा अर्थ तुमच्या मोबाईलवर एक otp म्हणजेच काही आकडे पाठवलेले असतात, ते जसेच्या तसे तुम्हाला enter otp
च्या खालच्या रकान्यात टाकायचे आहेत.
- त्यानंतर verify otp या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- पुढे तुमच्यासमोर एक आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर digitally signed 7/12, digitally signed 8a, digitally signed assets card, recharge account, charge records, price repute असे वेगवेगळे पर्याय दिसतील.
- यातल्या digitally signed 7/12 या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर 'डिजिटल स्वाक्षरीत सातबारा' असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन
होईल. यामध्ये सगळ्यात शेवटी सूचना दिलेली आहे की, "rs.15 could be
charged for down load of each satbara. This quantity will be deducted from to
be had balance."
- याचा अर्थ सातबाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील, ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील.
- आता आपण नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे आपल्या खात्यात इथं काही बॅलन्स नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं. ते कसे करायचे तर खाली असलेल्या रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम अप असेल तर त्याद्वारे जमा करता येऊ शकतात. तसे वेगवेगळे पर्याय इथे दिलेले आहेत.
- त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर परत गेले, तर तिथं तुम्हाला 15 रुपये तुमच्या खात्यात जमा असल्याचं दिसेल.
- आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे. यात जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर सर्व्हे किंवा गट नंबर टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड म्हणायचं आहे.
- त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. यावर स्पष्ट लिहिलेलं असतं की, हा सातबारा डिजटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.
साताबारा कसा वाचायचा?
सातबाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि खाली गाव नमुना 12 असतो.
गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.
यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट
क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितलं असतं.
भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात.
आमची जमीन भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीत येते. भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे
निर्बंध नसतात, शेतकरीच
या जमिनीचा मालक असतो. भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या
जमिनींचं हस्तांतर होत नाही.
यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या
जमिनी इ. जमिनींचा समावेश होतो.
तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या 'सरकार' या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी
मालकीच्या असतात.
चौथ्या प्रकारात 'सरकारी पट्टेदार' जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या
पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा ninety nine वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार
दिल्या जातात.
सातबारा हा ढोबळमानानं तीन प्रकारात विभागलेला
असतो. यात शेताचं नाव. भोगवटादाराचं नाव व क्षेत्र आणि शेवटी खाते क्रमांक असतो.
शेताचं नावासमोर शेताला काही ठरावीक नाव दिलेलं
असेल, तर
ते इथं नमूद केलेलं असतं. इथं तुमच्याकडे किती जमीन आहे ते
हेक्टर आरमध्ये दिलेलं असतं. ती जिरायती आहे, बागायती आहे का तेसुद्धा सांगितलेलं
असतं. एकूण क्षेत्र किती ती सांगितलेलं असतं. त्याखाली पोट खराब म्हणजेच लागवडीस
अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते.
त्यानंतर भोगवटादाराचं नाव म्हणजे ती जमीन
कुणाच्या मालकीची आहे, ते सांगितलेलं असतं. त्यासमोर या जमिनीवर किती कर म्हणजेच शेतसारा
आकारला जातो ते सांगितलं आहे. तिसऱ्या रकान्यात खाते क्रमांक असतो.
त्यात गाव नमुना आठ-असाठीचा खाते क्रमांक नमूद केलेला असतो. या भागात कर्जाचा बोजा
आहे का,विहीर
असेल तर त्यावर कुणाचा ह्क्क आहे, इ. माहितीही असते.
त्यानंतर खाली गाव नमुना -12 असतो. ही पिकांची नोंदवही असते.
यात तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पीकं घेतली, ती किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी
जलसिंचनाचा स्रोत काय आहे, हे नमूद केलेलं असतं.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.