आधार कार्ड हे महत्वाचे कार्ड झालं आहे. नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल किंवा घर घ्यायचं असेल नाहीतर लोन घ्यायचं असेल प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड गरजेचे आहे. पण याचमुळे आधार कार्डचा गैरवापर होत असल्याच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. यामुळे तुमच्या परवानगीविना कोणी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर करत नाही ना हे चेक करणे गरजेचे आहे.
तुमचे आधारकार्ड ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती तुमच्या गेल्या सहा
महिन्याच्या आधार कार्ड वेरिफीकेशनची माहिती मिळवू शकतो. म्हणजेच गेल्या सहा
महिन्यात तुमचे आधार कार्ड कुठे आणि किती वेळा वापरले गेले. याची माहीती समोरील
व्यक्ती मिळवू शकते. याची पडताळणी करण्यासाठी काय करायचे?.
· UIDAI च्या ऑफिशियल साइट https: resident.Uidai.Gov.In वर क्लिक करा.
· त्यानंतर वेबसाईटच्या
डाव्या बाजूला 'my aadhaar' चे ऑप्शन असेल त्यावर क्लिक
करा.
· मग 'aadhaar services' वर क्लिक करा.
· Aadhaar
authentication history वर क्लिक करा.
· नंतर १२ अंकांचा आधार नंबर
आणि कॅप्चा भरा.
· त्यानंतर खातरजमा
करण्यासाठी 'send otp'वर क्लिक करा.
· ओटीपीवर क्लिक केल्यानंतर
सबमिट बटनावर क्लिक करा.
· त्यानंतर तुमच्या आधार
कार्डशी संबंधित माहिती तुम्हाला मिळेल.
ती चेक केल्यानंतर तुमचे आधार कार्डचा कोणी गैरवापर करत असल्याचा
संशय आल्यास तात्काळ फ्री नंबर १९४७ या नंबरवर कॉल करा. अथवा [email protected] वर ईमेल करून तक्रार दाखल
करता येते.
तसेच https://resident.Uidai.Gov.In/document-complaint यावर ऑनलाईन तक्रारही तुम्ही करू शकता.
एखादं
बनावट, फेक अकाउंट तुमच्या आधारशी लिंक आहे का?
तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक आहे का? या प्रश्नाचं उत्तर
अनेकांकडे असेल. पण एखादं बनावट, फेक अकाउंट तुमच्या aadhaar शी लिंक आहे का? याचं उत्तर मात्र देता येणार
नाही. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड आणि बँक
अकाउंट्सचे वेळोवेळी अपडेट येत असतात. कोणत्याही बँक फ्रॉडपासून वाचण्यासाठी kyc अपडेट असणं अनिवार्य आहे.
बँक खातं लिंक नसल्यास, ते फ्रीज केलं जातं. त्यानंतर तुम्ही कोणतेही
फायनेंशियल ट्रान्झेक्शन करू शकणार नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड, बँक अकाउंटशी लिंक करणं
आवश्यक आहे. जर लिंक केलं असेल, तर बँक अकाउंट नक्की लिंक झालं की नाही तेदेखील पाहणं गरजेचं आहे.
तुमचे एकाहून अधिक बँक अकाउंट असल्यास, सर्व अकाउंट्स एका आधारशी जोडू शकता. तुमच्या आधार
कार्डशी किती अकाउंट लिंक आहेत, हे समजल्यास फायनेंशियल ट्रान्झेक्शनमध्ये समस्या येणार नाही, तसंच कोणतंही फेक, बनावट अकाउंटही जोडलं जाणार
नाही.
अनेकदा एकाच आधार कार्डशी अनेक फेक अकाउंट जोडली गेल्याचं, समोर आलं आहे. त्यामुळे
तुमच्या आधारशी कोणतं बनावट अकाउंट जोडलेलं नाही ना? हे वेळोवेळी तपासणंही गरजेचं आहे. याबाबतची माहिती uidai internet site वर मिळू शकते.
- UIDAI च्या अधिकृत वेबसाईट www.Uidai.Gov.In वर जावं लागेल.
- आता मेन पेजवर my aadhaar वर क्लिक करा.
- आता नवं पेज aadhaar provider वर जावं लागेल.
- त्यानंतर test aadhaar/bank linking पर्यायावर क्लिक करा.
- check
aadhaar/bank linking वर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल.
- नव्या पेजवर आधार कार्ड
नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- त्यानंतर otp टाकून, लॉगइनवर क्लिक करावं लागेल.
- आता नवं पेज ओपन होईल आणि तुमच्या आधारशी कोणतं बँक अकाउंट लिंक आहे, हे समजेल.
तुम्ही
मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
सध्या आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं
कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय आपण कोणतंचं सरकारी काम करू शकत नाही. अशात जर कधी
आपलं आधार कार्ड हरवलं, तर फार अडचण होते. आधार कार्ड हरवलं आणि त्यासोबत रजिस्टर असलेला
आपला मोबाईल नंबर आपल्या लक्षात नसेल तर ते आधार कार्ड परत कसं मिळवायचं हा प्रश्न
पडतो. हीच समस्या सोडवण्यासाठी uidai ने वापरकर्त्यांसाठी एक खास
सुविधा आणली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड
डाऊनलोड करू शकता.
Uidai च्या माहितीनुसार, आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी एक रजिस्टर्ड मोबाइल नंबर (registered cellular
number) असणं बंधनकारक नाही. ज्यांच्याजवळ आधार कार्डसोबत मोबाइल नंबर
रजिस्टर्ड नाही, असे लोक यूआईडीएआईच्या uidai.Gov.In या वेबसाईटवर लॉग-इन करून आपल्या आधार कार्डवरील 12 अंकी आधार क्रमांक तिथे
टाकून आधार कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करू शकतात.
मोबाईल नंबरशिवाय आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स
फॉलो करा -
- सर्वात आधी uidai च्या uidai.Gov.In या वेबसाईटवर लॉग-इन करा.
- त्यानंतर 'माय आधार' (my aadhaar) हा पर्याय निवडा.
- आता order aadhaar
reprint वर क्लिक करा.
- त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी vid नंबर टाका, त्यानंतर सिक्युरिटी कोड
टाका.
- नंतर 'my mobile Number isn't
registered' ऑप्शनवर क्लिक करा.
- आता जो मोबाईल नंबर आधार नंबरसोबत रजिस्टर्ड नाही तो तिथे भरा.
- send otp वर क्लिक करा.
- नियम आणि अटी-शर्तीच्या पर्यायासमोर दिलेल्या बॉक्समध्ये चेक-इन करा.
- त्यानंतर post बटनवर क्लिक करा.
- ऑथेंटिकेशन आल्यानंतर कम्प्यूटर मॉनिटरवर 'preview aadhaar letter' दिसेल.
- यानंतर ई-आधार डाऊनलोड करण्यासाठी पेमेंट करा.
- सर्वात शेवटी तुमच्या ई-आधार कार्डची पीडीएफ डाउनलोड करा.
Uidai ने सुरू
केलंय PVC कार्ड -
Uidai ने आधार कार्डची सुरक्षितता लक्षात घेत, काही दिवसांपूर्वीच aadhaar PVC कार्डची सुरुवात केली आहे. कोणताही आधार कार्ड धारक uidai च्या वेबसाइटवरून नवीन पोलिव्हिनाइल क्लोराइड card ऑर्डर करू शकतो. Uidai ने सांगितलं की, नवीन पोलिव्हिनाइल क्लोराइड aadhaar card ला सोबत कॅरी करणं खूप सोपं आहे. याची साईझ छोटी असते आणि तुम्ही ते कार्ड तुमच्या पर्स किंवा पॉकेटमध्ये आरामात ठेवू शकता.
4 Comments
Very useful information
ReplyDeleteThanks
DeleteSuperb sirji nice information
ReplyDeleteGreat information sirji
ReplyDeleteThanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.