MDM बॅकडेटेड माहिती भरणे सुरू झाले आहे. तरी सर्वांनी शाळा MDM लॉगिन करून माहिती भरावी . त्यासाठी
गुगल क्रोम वर MDM लॉगिन सर्च करावे.
1)सर्वप्रथम शाळा MDM लॉगिन करावी. यू डायस नंबर टाका. लॉगीन 🆔 म्हणुन तोच आहे.
2) शाळेचा एमडीएम पासवर्ड व कॅपच्या कोड टाकावा.
3) लॉगीन झाल्यावर सबमिट बटन क्लिक करा. कॅलेंडर येईल. निळ्या रंगाची दिनांक माहिती भरलेली आहे. राहिलेल्या माहितीचा महिना व साल निवडून तिथे कोणत्या दिवसाची माहिती राहिली आहे ते पाहावे. आलेले कॅलेंडर कोपऱ्यातील close बटनावर क्लिक करून घालवावे.
4)MDM daily attendance टच करावे.
5) दिनांक टच करावे.
6) भरावयाच्या माहितीचा महिना व वर्ष निवडावे.
7) त्या महिन्याचे कॅलेंडर ओपन होईल.
8) या तारखेची एमडी माहिती राहिली आहे ती तारीख टच करावी.
9) माहिती भरली नसेल तर कोरी माहिती दिसते त्या ठिकाणी इयत्तावार उपस्थिती व ताटांची संख्या टाकावी.
10) त्या दिवशीचा धान्यादी माल निवडावा.
11) update या बटनावर क्लिक करावे.
12) माहिती भरलेली successfuly हा मेसेज येईल.

0 Comments
Thanks For Visit. Please Dont enter any spam link in comment box.