सरल पोर्टल वर लॉगिन बाबत सुचना
1) लॉगीन सुरु असताना संकेतस्तळावरील log out बटन वर क्लिक न करता थेट Web browser close केल्यास पुन्हा संकेतस्तळावर login करण्यासाठी १० मिनिट इतका कालावधी लागतो त्यामुळे काही वेळानंतर login करावे.
2) शाळेचे login एकावेळी एकाच ठिकाणावरून होईल. एक login सुरु असताना एकापेक्षा अनेक login उपलब्ध होणार नाही, प्रथम सुरु असलेले लॉगीन व्यवस्थित logout केल्यानंतरच पुन्हा login करता येईल.
विद्यार्थी आधार कार्ड बाबत सर्वसाधारण सूचना.
१. शाळांनी विध्यार्थ्याची आधार कार्ड वरील माहिती student portal मध्ये शाळेने लॉगीन वर नोंद करणे आवश्यक आहे.
२. शाळांना student portal वर report मेनू मध्ये विद्यार्थी विषयक विविध मेनू दिलेले आहेत.
३. शाळांना aadhaar status असा मेनू देलेला आहे त्यातील शाळेच्या udise code वर क्लिक केल्यानंतर इयत्ता निहाय शाळेतील सर्व विधार्थ्याची आधार विषयक सर्व संख्यात्मक माहिती मिळेल. त्यामध्ये इयत्ता, शाखा, तुकडी, Validated Students by UIDAI, Invalid Students by UIDAI, Unprocessed Students, Aadhaar available Students, Aadhaar not available Students, Total Students याप्रमाणे विविध प्रकारची संख्यात्मक माहिती दिसेल.
४. Validated Students by UIDAI असे विद्यार्थी जे कि UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर वैध (Valid) आढळून आलेली विद्यार्थी होय.
५. Invalid Students by UIDAI असे विद्यार्थी जे कि - UIDAI ( भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविल्यानंतर अवैध (invalid ) आढळून आलेली विद्यार्थी होय.
६. Unprocessed Students - असे विद्यार्थी जे कि UIDAI ( भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण ) कडे पडताळणीसाठी पाठविण्यात आलेले नाहीत असे विद्यार्थी होय.
७. Aadhaar available Students - असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेने student portal मध्ये नोंदलेले विद्यार्थी होय.
८. Aadhaar not available Students असे विद्यार्थी जे कि ज्यांच्या आधार कार्डची माहिती शाळेकडे उपलब्ध नाही अथवा शाळेने student portal मध्ये नोंद केलेली नाही असे विद्यार्थी होय.
९. Total Students शाळेकडील चालू शैक्षणिक वर्षामध्ये शिकत असलेले विद्यार्थी होय.
आपल्याकडे जर Invalid students by UIDAI असेल तर अशा विद्यार्थ्यांना valid कसे करावे याबाबत माहिती खालील pdf मध्ये दिलेली आहे. त्यानुसार तात्काळ validation process करणे आवश्यक आहे.

0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.