Rashtriya Indian Military College (R.I.M.C.) DEHRADUN ENTRANCE EXAM. DEC 2021 | राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर 2021

 

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर 2021

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (उत्तराखंड) प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर 2021 ही फक्त मुलांसाठीच होती परंतु मा. सुप्रिम कोर्ट यांच्या Orders of honofable Supreme Court of india on writ petition 1416/2020 connected with WP (C) No. 524/2021 dated 07 Oct 2021. च्या आदेशान्वये आता ही परीक्षा मुलींना सुध्दा देता येणार आहे. तरी मुलांसाठी आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ही 30 ऑक्टोबर 2021 आहे व फक्त मुलींना आवेदनपत्र सादर करण्याची अंतिम मुदत ही 15 नोव्हेंबर 2021 असेल.

 



राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड

प्रवेशपात्रता परीक्षा डिसेंबर 2021

 

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यासाठी "राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेशपात्रता परीक्षा आहे" ही परीक्षा दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच होती परंतु आता ही परीक्षा मुली सुध्दा देऊ शकतील. मुलांसाठी दि. 30 ऑक्टोबर 2021 हीच आवेदनपत्र स्वीकारण्याची अंतिम मुदत असेल, मुलींसाठी आवेदनपत्र जमा करण्याची अंतिम मुदत ही 15 नोव्हेंबर 2021 असेल कृपया याची नोंद घ्यावी.

● प्रवेश वयाची अट:

या परीक्षेसाठी उमेदवाराचे (विद्यार्थ्याचे/ विद्यार्थीनीची वयोमर्यादा (वय) दिनांक 01 जुलै 2022 रोजी साडेअकरा (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजेच उमेदवाराचा (विद्यार्थ्याचा/विद्यार्थीनीचा) जन्म दिनांक 02 जुलै 2009 च्या आधि व दिनांक आणि 01 जानेवारी 2011 च्या नंतरचा नसावा.

Sainik Schools Entrance Examination 2022 For Class VI & IX

• शैक्षणिक पात्रता :

उमेदवार (विद्यार्थी/ विद्यार्थीनी) दिनांक 01 जुलै 2022 रोजी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी वर्गात शिकत असावा/ असावी किंवा 7 वी उत्तीर्ण झालेला झालेली असावी/असावा.

● परीक्षा शुल्क :

आवेदनपत्र (फॉर्म) ऑफलाईन किंवा ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आपण मागवू शकता:

परीक्षेसाठी मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड, यांचेकडून विहित नमुन्यातीलच आवेदनपत्र (फॉर्म) घ्यावयाचा आहे. जनरल संर्वगातील विद्यार्थी/विद्यार्थीनी (उमेदवारा) करीता रु. 600/- चा डी.डी. व अनुसूचित जाती/जमाती करीता रु. 555/- चा डी.डी. कमांडंट "राष्ट्रीय भारतीय सैन्य कॉलेज, डेहराडून, स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल भवन, देहरादून, बैंक कोड नं. (01576) च्या नावाने काढावा. सदर डी. डी. मा. कमांडंट "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडुन, उत्तराखंड, 248003 या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती/जमाती करीता डी. डी. सोबत जातीच्या दाखल्याची सत्यप्रत / छायांकितप्रत पाठविणे बंधनकारक आहे. डी. डी. पाठवितांना आपल्याला ज्या पत्त्यावर आवेदनपत्र (फॉर्म) मागवायचा आहे तो पत्ता पिन कोड सह अचूक नमूद करावा. त्यानंतर आपणास आवेदनपत्र (फॉर्म) व मागील १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संच व माहिती पुस्तीका स्पीड पोस्टाव्दारे आपण दिलेल्या पत्त्यावर प्राप्त होईल.

२) ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून परीक्षेसाठी आवेदनपत्र (फॉर्म) मा कमांडंट राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज,डेहराडून यांच्याकडून मागविण्याकरीता आपण राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांच्या www.rimc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने पैसे भरून आवेदनपत्राची (फॉर्म) ची मागणी आपण करू शकता.

> आवेदनपत्र परीपूर्ण पणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद 17 डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देऊळाजवळ, पुणे 411001 या पत्त्यावर पोहचतील अशा पध्दतीने स्पीड पोस्टाने पाठवावीत किंवा समक्ष जावून जमा करावीत. फक्त मुलींसाठी दिनांक 15 नोव्हेंबर 2021 व मुलांसाठी 30 ऑक्टोबर 2021 ही आवेदनपत्र (फॉर्म) जमा करण्याची अंतिम मुदत आहे. अंतिम मुदतीनंतर उशीराने आलेले आवेदनपत्र (फॉर्म) कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वीकारले जाणार नाहीत.

> भारत सरकार, संरक्षण मंत्रालय यांचे पत्र क्र. A/36105/GS/MT-6/D (GS-II) दिनांक 03 सप्टेंबर 2014 नुसार केंद्र सरकारी नोकरीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मुले/मुली लेखी आणि मौखिक परीक्षा ज्या राज्यामध्ये संबधीत कर्मचाऱ्यांची पोस्टींग आहे त्या ठिकाणी देवू शकतात. त्या मुलांची/मुलींची निवड त्यांच्या मुळ अधिवास राज्यानुसार हाईल आणि त्यांची उमेदवारी देखील त्यांच्या मूळ अधिवासाच्या स्थितीनुसार असेल. उमेदवार (विद्यार्थी/विद्यार्थीनी) ज्या राज्यातून परीक्षा देऊ इच्छितो त्याच राज्यात सादर करणे बंधनकारक आहे.

आवेदनपत्र कसे भरावे:

आवेदनपत्र (फॉर्म) २ (दोन) प्रतीमध्ये भरणे आवश्यक आहे. त्यासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे.

वर्ग 6 व 9 साठी सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022

१. जन्म दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)

२. अनुसूचित जाती / जमातीसाठी जातीच्या दाखल्याची छायाप्रत (झेरॉक्स कॉपी), ३. अधिवास (Dormicile Certificate) प्रमाणपत्र छायाप्रत (झेरॉक्स कॉपी)

४. शाळेच्या बोनाफाईट सर्टिफिकेटची मुळ प्रत फोटोसह मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे.

५. आवेदनपत्रासोबत विद्यार्थ्याचे/ विद्यार्थीनीचे उमेदवाराचे आधारकार्ड छायाप्रत (झेरॉक्स कॉपी) जोडणे बंधनकारक आहे आणि ते जमा न केल्यास विद्यार्थ्याचे विद्यार्थीनीचे उमेदवाराचे) आवेदनपत्र (फॉर्म) रद्द करण्यात येईल.

६. आवेदनपत्र भरताना ४ (चार) पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहे. त्यापैकी २ (दोन) फोटो आवेदनपत्रावर (फॉर्मवर) चिकटवून त्याखाली उमेदवाराने (विद्यार्थ्याने/विद्यार्थीनीने) स्वाक्षरी करावी व २ (दोन) फोटोंच्या माठीमागे नाव व स्वाक्षरी करून फॉर्म सोबत जोडावे उपरोक्त कागदपत्रांच्या छायाप्रत ( झेरॉक्स कॉपी) मुख्याध्यापकांमार्फत किंवा राजपत्रित अधिकार्‍यामार्फत साक्षांकित (Attested) करून आवेदनपत्रासोबत (फर्मिसोबत) जोडावेत.

परीक्षेचे वेळापत्रक

अ.क्र.

वार

दिनांक

विषय

वेळ

गुण

1

शनिवार

18/12/2021

गणित

सकाळी 9:30 - 11:00

200

2

सामान्य ज्ञान

दुपारी 12:00 - 1:00

75

3

इंग्रजी

दुपारी 2:30 - 4:30

125

 

● लेखी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची (विद्यार्थ्यांची/ विद्यार्थीनीची) मौखिक परीक्षा दिनांक व मौखिक परीक्षेस पात्र उमेदवारांची (विद्यार्थ्यांची विद्यार्थीनीची) नावे नंतर कळविण्यात येईल.

आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अपडेटेड माहिती मिळवा. जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


माहीतीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Rashtriya Indian Military College (R.I.M.C.) DEHRADUN

ENTRANCE EXAMINATION DECEMBER 2021

The RIMC Examination for admission to Class VIII in the Rashtriya Indian Military College, Dehradun, for the 01 July 2022 term will be held at pune for Maharashtra on 18 December 2021 (Saturday)

Sainik Schools Entrance Examination 2022 For Class VI & IX

Boys and Girls are eligible to apply for admission to the RIMC, Deharadun. The candidate should either be studying in class VII or passed class VII From any recognized school at the time of admission to the RIMC, i.e on 01 July 2022 They should not be less than 11 ½ years in age but should not have attained the age. of 13 years as on 01 July 2022 (ie they should not be born earlier then 02 July 2009 and not later than 01. January 2011.)

The Prospectus cum application form and booklet of old question papers can be obtained from The Rashtriya Indian Military College, Garhi Cantt, Dehradun, Uttarakhand Pin-248 003 through the speed post by forwarding self addressed slip and on account payee bank demand draft of Rs. 600/- for general candidates, Rs. 555 for SC/ST candidates alongwith Cast Certificate. The demand draft will be made in favour of The Commandant RIMC Deharadhun drawee branch, State Bank of India. Tel Bhavan, Dehradun (Bank code 01576) Uttarakhand.

Online Payment The Prospectus-cum-application form and booklet of old question papers can also be obtained by making online payment of Rs. 600/- for General Candidates & Rs.555/- for SC/ST candidates on RIMC website www.rimc.gov.in On receipt of the payment the prospectus-cum application form and booklet of old question papers will be dispatched by Speed post only.

Application in duplicate on prescribed form accompanied by documents to be attached with

application form two passport size photographs, Domicile certificate of candidate, Birth certificate, SC/ST certificate and certificate from principal of the school in original with photograph on it attested stating date of birth and in which class studying.

As per the government of India, Ministry of defence letter No. A/36105/GS/MT-6/D (GS-II) dated 03 Sep 2014, the wards of Central Government employees can undertake their exam and viva-voce at the place of posting of employee/domicile state. However, their candidature will be considered from their original domicile stare. Therefore it is mandatory to get the application deposited in the same state where the exam has to be undertaken.

For Girls Only Completely filled application form and attached documents Hon. Commissioner, Maharashtra State Examination Council, 17. Dr. Ambedkar Marg, Near Red Temple, Pune - 411 001. Speed post should be sent this address by 15th November 2021. And boys Completely filled application form should be sent 30 October 2021.  Applications received after the deadline will not be accepted under any circumstances

Documents:

1. Birth Certificate (issued by municipal Corporation/gram Panchayat). 2. Domicile Certificate of the Candidate.

3. SC/ST Certificate (where applicable).

4. A certificate the principal of the current School in which the student is studying, with photograph attested stating the date of birth (as per the school records) and the class in which candidate is studying to be submitted in original.

5. Photocopy of Aadhaar Card (both sides) is mandatory requirement failing which application will be rejected.

6. Two passport size photographs.

For Girls only The application form should reach to Commissioner, Maharashtra State Council of Examination, 17 Dr. Ambedkar Road, Pune - 411001, by 15th November 2021. And boys application form should be sent 30 October 2021.

Time Table of Exam

Conduct of viva-voce of only those Candidates who qualify the written exam - Date will be intimated later.

Click here for pressnote

आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि अपडेटेड माहिती मिळवा. जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments