सध्या लोक डिजिटल व्यवहारांसाठी G-Pay, Phone-Pe, PayTM यासारख्या अनेक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा भरपूर वापर करताना दिसतात. मात्र
डिजिटल व्यवहार जितके फायदेशीर तितकेच ते काळजीपुर्वक न केल्यास धोकादायकही ठरु
शकतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ऑनलाइन फसवणूकीत
देखील झपाट्याने वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हॅकर्स नवीन पद्धती वापरुन फ्रॉड करत
आहेत. काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास, आपण स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकतो.
NPCI चे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ( UPI ) एकाच बँक ऍपला अनेक बँक खाती जोडून
आर्थिक व्यवहार सुलभ करण्यास मदत करते. UPI ही एक आंतरबँक निधी हस्तांतरण सुविधा
आहे, याद्वारे फोन नंबर आणि व्हर्च्युअल
आयडीच्या मदतीने स्मार्टफोनवर पेमेंट करता येते. हे इंटरनेट बँक निधी
हस्तांतरणाच्या यंत्रणेवर आधारित आहे. NPCI व्दारे
ही प्रणाली नियंत्रित केली जाते.
विना इंटरनेट देखील आपण पैसे ट्रान्सफर करु शकता.
- · लक्षात ठेवा की तुम्हाला पैसे पाठवायचे असेल तेव्हाच तुम्हाला UPI पिन टाकावा लागतो. पैसे आपल्या अकाउंट मध्ये मिळवण्यासाठी पिन टाकणे आवश्यक नाही.
- · जर तुम्हाला ग्राहक सेवेशी संपर्क साधण्याची आवश्यकता वाटत असेल तर फक्त पेमेंट ऍप्लिकेशन वापरा. इंटरनेटवर दिलेल्या फोन नंबरवर कॉल करू नका, सदर नंबर फेक असण्याची शक्यता असते.
- · UPI PIN कोणासोबतही शेअर करू नका. फसवणूक करणारे त्याचा चुकीचा वापर करून तुमची फसवणूक करू शकतात.
- · कोणत्याही वेबसाइटवर किंवा कोणत्याही प्रकारच्या गुगल फॉर्ममध्ये UPI पिन टाकु नका.
- · पेमेंटशी संबंधित माहिती उदा. ओटीपी वगैरे कोणाशीही शेअर करू नका.
- · सीव्हीव्ही नंबर, पासवर्ड अशा स्वरुपाची माहीती कोणालाही देऊ नका.
0 Comments
Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.