महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आज दि.१४/०७/२०२१ रोजी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्राने शिक्षक बदल्याना पुन्हा एकदा ब्रेक लागल्याचे दिसत आहे. सदरचा ब्रेक लावतांना ग्रामविकास विभागाने नमूद केले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुधारित धोरणानुसार संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने त्यांना वगळून जिल्हा परिषदेच्या अन्य गट क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या ग्रामविकास विभागाच्या दिनांक १५.५.२०१४ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. ९.७.२०२१ च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या कालावधीत करण्यात याव्यात.
आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते या गोष्टीकडे की, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठीचे तयार करण्यात आलेले सॉफ्टवेअर कार्यान्वीत कधी होणार?आणि तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांच्या बदल्या होणार किंवा नाही?
सदरचे ग्रामविकास विभागाचे पत्र खाली दिले आहे.
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️
1 Comments
चालु दया...
ReplyDeleteThanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.