इयत्ता पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके कशी डाउनलोड करावी?

 



  • ·         इयत्ता 1 ते 12 सर्व पाठ्यपुस्तके
  • ·         मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगु, तमिळ, बंगाली या सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके उपलब्ध

 

मित्रांनो  मागील शैक्षणिक सत्रापासून म्हणजेच सन 2020-21 पासुन महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शाळा बंद आहेत. मात्र मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने ऑनलाइन अध्ययन अध्यापन सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे वर्षभर ऑनलाइन शिक्षण सुरू होते. तरीही अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणामध्ये अडचण निर्माण झालेली असू शकते असे गृहीत धरून मागील इयत्तांचे सर्व कौशल्य व क्षमता विद्यार्थ्याना आत्मसात करता याव्यात म्हणुन शासनाने यावर्षी 45 दिवसाचा ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम तयार केला आहे. हा अभ्यासक्रम मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित आहे. मात्र शिक्षण विभागाच्या यापूर्वीच्या सूचनेनुसार मुलांची पाठ्यपुस्तके शाळेत जमा करण्यात आलेली आहेत आणि ती  नवीन वर्गांना वाटप देखील करण्यात आलेली आहेत. मात्र ब्रिज कोर्स साठी मुलांना मागील  वर्गाची पाठ्यपुस्तके आवश्यक असणार आहेत.

त्याचप्रमाणे यावर्षीचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झालेले आहे मात्र अद्यापही नवीन वर्गाची नवी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत.

यावर उपाय म्हणून बालभारती ने तयार केलेली पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर कशा पद्धतीने डाऊनलोड करायची याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 

 

 इयत्ता पहिली ते बारावीची पाठ्यपुस्तके कशी डाउनलोड करावी?




  • सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये ebalbharati असा key word  टाकून सर्च करायचे आहे.
  • आपल्यासमोर ई बुक लायब्ररी ओपन झालेली असेल (www.cart.ebalbharati.in)  त्यावर क्लिक करा 
  • वरच्या पट्टीमध्ये आपणास ज्या वर्षाच्या पाठ्यक्रमाची पाठ्यपुस्तके हवी आहेत ते वर्ष निवडा.
  •  त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या सेक्शन मधून वर्ग निवडा.
  •  त्याखाली  माध्यम निवडण्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत, आपणास ज्या माध्यमाची पाठ्य पुस्तके हवी आहेत ते माध्यम निवडा.
  •  त्याखाली आपणास ज्या विषयाचे पाठ्यपुस्तक हवे आहेत तो विषय निवडा.
  •  आता तुमच्या समोर तुम्हाला हवे असलेले पाठ्यपुस्तक दिसत असेल.
  •  त्याखाली असलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करून तुम्ही हे पाठ्यपुस्तक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकता.

Post a Comment

1 Comments

Thanks For Visit. Please Don't enter any spam link in comment box.